अक्षय वाघमारेच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:30 IST2026-02-13T13:24:32+5:302026-02-13T13:30:01+5:30
योगिता - अक्षय दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. अशातच या दोघांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी लेकीचं बारसं केलं असून तिचं खास नाव ठेवलं आहे.

अक्षय वाघमारेच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांनी केलं कौतुक
अभिनेता अक्षय वाघमारे आणि त्याची पत्नी योगिता गवळी काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. योगिता - अक्षय दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. अशातच या दोघांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी लेकीचं बारसं केलं असून तिचं खास नाव ठेवलं आहे.
अक्षयने ठेवलं लेकीचं हे नाव
अक्षय-योगिताने सोशल मीडियावर बारश्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या खाली त्यांनी कॅप्शनमध्ये लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. अक्षय - योगिताने मुलीचं नाव श्रीधा असं ठेवलं आहे. श्रीधाचा अर्थ "समृद्धी देणारी", "धन", "लक्ष्मी" किंवा "सौभाग्य" असा होतो. अक्षय आणि योगिताने लेकीच्या नावाचा खुलासा करताच चाहत्यांनी कमेंट करुन त्यांचं अभिनंंदन केलं आहे आणि इतकं गोड नाव ठेवल्याबद्दल कौतुक केलं आहे.
अक्षयने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत 'सीझन १- मुलगी १, सीझन २- पुन्हा एकदा मुलगी, असं लिहून मुलगी झाली हो'', असं कॅप्शन त्याने लिहून मुलगी झाल्याची गुड न्यूज सर्वांना सांगितली होती. ''सीझन २ रिलीज, पोरगी झाली रे...'', अशा खास शब्दात अक्षयने त्याचा आनंद शेअर केला होता. अक्षयने ही आनंदाची बातमी शेअर करताच मराठी कलाकारांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं. आता लेकीचं इतकं खास ठेवल्याने अक्षया - योगिताने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.