Video: आयुष्यभर तुला सांभाळण्याचा वसा..; लग्नात योगिता - सौरभचा एकमेकांसाठी कमाल उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:44 AM2024-03-04T11:44:52+5:302024-03-04T11:48:28+5:30

सौरभ चौगुलेने लग्नात योगितासाठी हटके उखाणा घेतलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

actress yogita chavan saorabh choughule ukhana video viral wedding updates | Video: आयुष्यभर तुला सांभाळण्याचा वसा..; लग्नात योगिता - सौरभचा एकमेकांसाठी कमाल उखाणा

Video: आयुष्यभर तुला सांभाळण्याचा वसा..; लग्नात योगिता - सौरभचा एकमेकांसाठी कमाल उखाणा

'जीव माझा गुंतला' मालिकेतील ऑनस्क्रीन कपल अर्थात योगिता - सौरभ या दोघांनी काल एकमेकांशी थाटामाटात लग्न केलं. योगिता - सौरभ हे ऑनस्क्रीन कपल खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. योगिता - सौरभच्या लग्नाच्या फोटो अन् व्हिडीओंवर त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली. अशातच सौरभने लग्नात योगितासाठी घेतलेला उखाणा चांगलाच व्हायरल झालाय. 

सौरभचा योगिताच्या लग्नातला उखाणा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत सौरभने उखाणा घ्यायच्या आधी योगिताचा हात हातात घेतला. आणि म्हणाला.."आयुष्यभर तुला सांभाळण्याचा वसा मी घेतला.. योगिताचं नाव घेतो तिच्यात जीव माझा गुंतला." असा उखाणा सौरभने घेतला. पुढे जेवताना योगिताने सौरभसाठी उखाणा घेतला की.. "जागोजागी होईल मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास."

सौरभने योगितासाठी घेतलेला उखाणा तिला चांगलाच आवडलेला दिसतोय. याशिवाय सौरभ - योगिताच्या उखाण्यावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. योगिता - सौरभने 'जीव माझा गुंतला' मालिकेत एकत्र काम केलं. याच मालिकेच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी खुलली, अशी चर्चा आहे. योगिता - सौरभच्या लग्नाला मालिकाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 

Web Title: actress yogita chavan saorabh choughule ukhana video viral wedding updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.