'मुलीचे हातपाय तोडून बॅगेत भरुन पाठवेन'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या EX बॉयफ्रेंडने दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 09:26 IST2024-01-31T09:26:07+5:302024-01-31T09:26:27+5:30

Tv actress: अभिनेत्रीला प्रेमात दोनदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.

actress-smriti-khanna-first-husband-was-smuggler-got-life-threatening-messages-from-ex-boyfriend-know-her-love-life | 'मुलीचे हातपाय तोडून बॅगेत भरुन पाठवेन'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या EX बॉयफ्रेंडने दिली होती धमकी

'मुलीचे हातपाय तोडून बॅगेत भरुन पाठवेन'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या EX बॉयफ्रेंडने दिली होती धमकी

बॉलिवूड आणि छोट्या पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री स्मृती खन्ना सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहेय २०१७ मध्ये स्मृतीने राधिका मदानसोबत स्क्रीन शेअर करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. स्मृती आज लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये तिने बरंच यश मिळवलं आहे. मात्र, पर्सनल आयुष्यात तिला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या लव्हलाइफ आणि वैवाहिक जीवनावर भाष्य केलं. यात तिच्या EX बॉयफ्रेंडने तिच्या मुलीला इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती, असा खुलासा तिने यावेळी केला.

स्मृतीने २०१७ मध्ये अभिनेता गौतम गुप्ता याच्यासोबत लग्नगाठ बांधली. परंतु, यापूर्वी ती एका तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये होते. या रिलेशनशीपमध्ये तिला बराच त्रास सहन करावा लागला.याविषयी तिने भाष्य केलं.

"मी शाळेत असताना एका मुलाच्या प्रेमात पडले. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मी त्याच्यासोबत लग्न केलं. हे माझं पहिलं लग्न होतं. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. काही महिन्यातच आम्ही वेगळे झालो. मी त्या मुलाला ओळखू शकले नाही. तो माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक करत होता. तो अनेक गैरमार्गाने होणाऱ्या गोष्टी करत होता. तो स्मगलर होता. लग्नानंतर त्याचं माझ्यासोबतचं वागणं बदललं तो मला त्याच्या घरी येऊ देत नव्हता. सतत कारणं द्यायचा. या सगळ्याला कंटाळून मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तो मला फसवतोय हे समोर आलं", असं स्मृती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "या सगळ्यातून बाहेर पडल्यानंतर मी करिअरवर फोकस केला. सुरुवातीला मुंबईत काम केलं पण पुरेसे पैसे मिळत नव्हते. मग मी पुन्हा दिल्लीला आले आणि मॉडेलिंग करु लागले.  याच काळात मी पुन्हा प्रेमात पडले. पण, तो सुद्धा पहिल्या नवऱ्यासारखाच निघाला. मुंबईत आमची ओळख झाली होती. पण,तो फार बंधनात ठेवायचा. हे करु नकोस, ते करु नकोस, सिनेमात काम करायचं नाही असं त्याचं सुरु झालं. तो टॉक्सिक व्यक्ती होता. जर त्याचं ऐकलं नाही तर तो मारहाण करायचा."

हातपाय तोडाची दिली होती धमकी

"तो गुंड प्रवृत्तीचा माणूस होता. जर तुला माझ्यासोबत रहायचं नसेल तर मुंबई सोडून निघून जा असं त्याने मला सांगितलं. तो मला फसवतोय हे समोर आल्यानंतर त्याने माझ्या आईला बरंच वाईटसाईट बोलला. जर तुम्हाला तुमची मुलगी सुखरुपपणे हवी असेल तर तिला पुन्हा घरी बोलवून घ्या. नाही तर तिचे हातपाय तोडून एका बॅगेत भरून घरी पाठवून देईन. तिला माझ्यासोबत रहायचं नाहीये ना मग मी सुद्धा तिला मुंबईत राहू देणार नाही, अशी धमकी त्याने माझ्या आईला दिली होती."

दरम्यान, या सगळ्यातून स्मृती पुन्हा बाहेर पडली. दिल्लीला गेल्यावर तिला एक पंजाबी सिनेमाची ऑफर मिळाली. हा सिनेमा सुरु असतानाच तिला कामाच्या अनेक ऑफर्स मिळाल्या. त्यानंतर काम करण्यासाठी ती पुन्हा मुंबईत गेली आणि मालिकांमध्ये काम करु लागली. 'इट्स कॉम्प्लिकेटेड' या कार्यक्रमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ती 'मेरी आशिकी तुमसे ही' मध्ये काम करायची संधी मिळाली. याच मालिकेच्या सेटवर तिची ओळख अभिनेता गौतमसोबत झाली आणि ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.

Web Title: actress-smriti-khanna-first-husband-was-smuggler-got-life-threatening-messages-from-ex-boyfriend-know-her-love-life