प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:19 IST2025-08-31T12:15:31+5:302025-08-31T12:19:41+5:30

Priya Marathe Passes Away: अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

actress priya marathe passes away at the age of 38 she stopped working due to health reasons the audience became emotional | प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक 

प्रकृतीच्या कारणास्तव काम करणं थांबवलं अन्...; 'ती' ठरली प्रिया मराठेची शेवटची मालिका, प्रेक्षक झाले भावुक 

Priya Marathe Passes Away : आजचा दिवस उजाडला तो एका दु: खद बातमीने. मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे.आज पहाटे ४ च्या सुमारास प्रिया मराठे हिचे कॅन्सरने निधन झाले. गेली दीड वर्षे या आजाराशी ती झुंज देत होती.मात्र पहाटे ४ च्या सुमारास मीरा रोड येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला.आपल्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या  प्रिया मराठेच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.

आपल्या ३८ वर्षांच्या कारकीर्दीत प्रिया मराठेने मराठी-हिंदी मालिका तसेचनाटक अशा माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला होता. प्रियाने 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण','स्वराज्यरक्षक संभाजी','येऊ कशी कशी मी नांदायला' अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसचं तिने 'पवित्रा रिश्ता', 'उतरन', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शेवटची ती तुझेच मी गीत आहे या मालिकेत दिसली. छोट्या पडद्यावरील या मालिकेत तिने साकारलेली मोनिका कामत प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर प्रिया मराठे ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतही दिसली. त्यानंतर प्रिया कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये दिसली नाही.

आजारपणामुळे अर्ध्यावर  सोडली मालिका...

प्रिया मराठे तिच्या आजारपणामुळे 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका सोडली होती. २०२३ मध्ये सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ शेअर करत प्रियाने तिच्या चाहत्यांना माहिती दिली होती."तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मी मोनिका कामत हे पात्र साकारत होते.  या पुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये. अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागल आहे.  मोनिका कामत ही भूमिका करताना मला खूप मज्जा येत होती.  तुम्हालाही ही भूमिका खूप आवडत होती. तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना वेळ देऊ शकत होते, तो वेळ कुठेतरी कमी पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट, प्रोडक्शन टीम, तसंच तो रोलही फार डिमांडिग होता. या सगळ्याला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी मालिकेतून निरोप घेतेय". असं प्रिया म्हणाली होती.  

Web Title: actress priya marathe passes away at the age of 38 she stopped working due to health reasons the audience became emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.