अभिनेत्रीने मुंबईपासून दूर घेतलेली जमीन, आता फार्महाऊस उभारणार; म्हणाली, "माझ्या मुलींना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 15:26 IST2026-05-17T15:26:01+5:302026-05-17T15:26:51+5:30
निसर्गाच्या सान्निध्यात राहून ऑर्गॅनिक शेती करणार अभिनेत्री

अभिनेत्रीने मुंबईपासून दूर घेतलेली जमीन, आता फार्महाऊस उभारणार; म्हणाली, "माझ्या मुलींना..."
टीव्हीवरची सीता म्हणजेच अभिनेत्री देबिना बॅनर्जी युट्यूबरही आहे. तिचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. देबिना आणि तिचा पती गुरमीत चौधरी दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. त्यांना दोन क्युट मुलीही आहेत ज्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. दोन वर्षांपूर्वी देबिनाने मुंबईपासून दूर जमीन घेतली होती. तेव्हा तिच्या मुली दोन वर्षांच्या होत्या. आता तिने त्या जमिनीवर फार्म हाऊस उभारण्याचं काम सुरु केलं आहे. याची झलकही तिने शेअर केली आहे.
देबिना बॅनर्जीने फार्म हाऊसची झलक दाखवत तिथेच ऑर्गॅनिक शेती करणार असल्याचा प्लॅन सांगितला. तेथे उगवलेल्या भाज्या ती मुंबईत घेऊन येणार आहे. देबिनाने दोन्ही मुलींच्या हस्ते जमिनीची पूजा करत फार्म हाऊसचं काम सुरु केलं आहे. एका मुलीच्या हाताने नारळ फोडण्यात आला आणि काम सुरु झालं. 'मी इथे शेती करेन, मुलींनाही शिकवेन. त्यांना शुद्ध आणि भेसळविरहित सगळं खायला मिळेल. यासोबत आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहता येईल. आज सोनं महागलं आहे उद्या ऑक्सिजनही महाग होईल.' असंही ती म्हणाली.

देबिना या नवीन फार्महाऊससाठी खूप उत्साहित आहे. तिच्या या जागेवरुन दूर डोंगर दऱ्याचा सुंदर नजाराही दिसतो आहे. आपल्या मुली इथेच जास्त वेळ घालवतील आणि निसर्गाचं महत्व त्यांना पटेल हा देबिनाचा उद्देश आहे. मुलींच्या संगोपनासाठी आणि भविष्यासाठी देबिनाने करत असलेल्या या कामाचं चाहते कौतुक करत आहेत. देबिना फक्त चांगली आईच नाही तर चांगली नागरिकही आहे अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.