"लाडू देऊन ती लोकांवर काळी जादू करायची"; प्रसिद्ध अभिनेत्याचे Ex गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:48 IST2025-07-25T10:44:11+5:302025-07-25T10:48:21+5:30

अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

actor rahul raj singh makes serious allegations against actress pratyusha banerjee mother | "लाडू देऊन ती लोकांवर काळी जादू करायची"; प्रसिद्ध अभिनेत्याचे Ex गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप

"लाडू देऊन ती लोकांवर काळी जादू करायची"; प्रसिद्ध अभिनेत्याचे Ex गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप

'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आणि सर्वांना धक्का बसला. या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. १ एप्रिल २०१६ रोजी प्रत्युषाने आत्महत्या केली होती. परंतु काही काळानंतर प्रत्युषाने आत्महत्या केली नाही तर तिचा अपघात झाला होता,  असं प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगने सांगितलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय प्रत्युषाची आई लाडू देऊन वशीकरण करायची, असाही गंभीर आरोप राहुलने केलाय. काय म्हणाला राहुल? जाणून घ्या

प्रत्युषाची आई जादूटोणा करायची

इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत राहुलने प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासा केला, प्रत्युषाची आई काळी जादू करायची. बंगाली असल्याने प्रत्युषाची आई खूप पूजा-पाठ करायची. एकदा तिची आई मला लाडू खायला देत होती. तो लाडू मी घेत होतो इतक्यात प्रत्युषाने मला लाडू खायला मनाई केली. कारण त्या लाडूमध्ये वशीकरणाची ताकद असते, असं प्रत्युषाने नंतर मला सांगितलं. पण तरीही मी एकदा लाडू खाल्ला होता.

प्रत्युषाचा एक्स - बॉयफ्रेंड पुढे असंही म्हणाला की, मुलीच्या नावावर तिच्या आई-बाबांनी अनेक ठिकाणांहून कर्ज काढलं. त्यामुळे त्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी ते प्रत्युषाशी भांडण करायचे. बंगाली लोकांमध्ये जादूटोणा करणं ही नॉर्मल गोष्ट आहे. अनेक बंगाली भागांमध्ये हे केलं जातं. "तू जर आईने दिलेला लाडू खाल्लास तर ती तुला त्रास देऊ शकते. याशिवाय ती तुझ्या नावावर जे काही आहे ते स्वतःच्या नावावर करेल", असं प्रत्युषा त्याला म्हणाली होती. २०१६ रोजी पंख्याला लटकून गळफास घेत प्रत्युषाने आत्महत्या केली होती.  त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

Web Title: actor rahul raj singh makes serious allegations against actress pratyusha banerjee mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.