"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:46 IST2026-03-17T15:41:12+5:302026-03-17T15:46:46+5:30

आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

abhijit khandkekar make fun of Pooja Birari infront of actress Suchitra Bandekar | "तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

"तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे..." पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात स्टार प्रवाहवरील मालिकांमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. स्टार प्रवाहवरील काही मालिका आदेश बांदेकर- सुचित्रा बांदेकर यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. आदेश-सुचित्रा यांची सून पूजा बिरारीही अभिनेत्री आहे. आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

अभिजीत खांडकेकर आणि अनुष्का सरकटे हे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी अभिजीत खांडकेकर पूजाला उद्देशून म्हणाला, ''आता तर काय बोलायची सोयच नाही, अगं तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत ना. त्यामुळे जरा काही बोललं, एक 'आदेश' आला तर माझ्या चेहऱ्याचं 'सुचित्र' बिघडेल, आणि मग मी जातोय हिमालयात 'सोहम mmm 'म्हणत.'' अभिजीत हे बोलत असताना पूजाची हसून हसून पुरेवाट झाली. ''अरे काय बोलतोय?'', असे हातवारे करुन पूजाची बोलतीच बंद झाली.

 




पूजा-सोहमच्या लग्नाची चर्चा

डिसेंबर २०२५ मध्ये कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत शाही थाटात पूजा आणि सोहम बांदेकरचं लग्न संपन्न झालं. लग्नमंडपात पूजाने घेतलेली खास एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून गेली. पूजा आणि सोहमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करुन या दोघांंचं स्वागत केलं. त्यानंतर विधीवत सोहम आणि पूजा लग्नबंधनात अडकले. एकूणच पूजा आता बांदेकर कुटुंबाची लाडकी सून झाली आहे. 

Web Title : पूजा बिरारी की हाज़िरजवाबी; सास सुचित्रा बांदेकर ने तालियाँ बजाईं।

Web Summary : स्टार प्रवाह अवॉर्ड्स 2026 में, होस्ट अभिजीत खांडकेकर ने पूजा बिरारी को उनके प्रोड्यूसर सास-ससुर बांदेकर के बारे में मज़ाकिया अंदाज़ में छेड़ा। सोहम बांदेकर से विवाहित पूजा, इस मजाक पर हंसी से चुप हो गईं। कार्यक्रम में स्टार प्रवाह की प्रतिभा का जश्न मनाया गया, जिसमें पूजा और सोहम की दिसंबर 2025 में हुई भव्य शादी पर प्रकाश डाला गया।

Web Title : Pooja Birari's witty take; Mother-in-law Suchitra Bandekar claps.

Web Summary : At Star Pravah Awards 2026, host Abhijit Khandkekar playfully teased Pooja Birari about her producer in-laws, the Bandekars. Pooja, married to Soham Bandekar, was speechless with laughter at the joke. The event celebrated Star Pravah's talent, highlighting Pooja and Soham's grand wedding in December 2025.