Bigg Boss 16: Bigg Boss 16च्या वीकेंडमध्ये धमाका, अब्दु रोजिकचं बिग बॉसमध्ये कमबॅक, पण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 13:56 IST2022-12-23T13:34:53+5:302022-12-23T13:56:06+5:30
रिपोर्टनुसार अब्दू रोजिक बिग बॉस १६ मध्ये परतला आहे आणि सध्या तो घरातच आहे.

Bigg Boss 16: Bigg Boss 16च्या वीकेंडमध्ये धमाका, अब्दु रोजिकचं बिग बॉसमध्ये कमबॅक, पण....
अब्दू रोजिकला बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं आहे. अलीकडेच, अब्दू एक टास्क पूर्ण करण्यासाठी शोच्या बाहेर गेला तेव्हा घरातील सदस्यांनी तसेच चाहत्यांनी त्याला खूप मिस केले. सोशल मीडियावर तर अब्दूला शोमध्ये परत आणण्याची मागणी केली गेली होती. आता अब्दू परत आल्याने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
रिपोर्टनुसार अब्दू रोजिक बिग बॉस १६ मध्ये परतला आहे आणि सध्या तो घरातच आहे. वीकेंड वारला त्याची झलक पाहायला मिळणार आहे. त्याला बघून घरातील सदस्यांच्या आनंदाचा ठिकाणा राहिला नाही. खास करुन शिव ठाकरे आणि एमसी स्टेन यांना जास्त आनंद झाला.
अब्दू जानेवारीत शो सोडणार!
अब्दू रोजिकशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, तो काही दिवसांसाठीच शोमध्ये आला आहे. कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच शो सोडावा लागणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
यावेळी सलमान खानसोबत मनीष पॉल हा शो होस्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा घरात पाहुणे म्हणून येणार आहेत. सलमान या आठवड्यात शालीन आणि एमसी स्टॅनला त्यांच्या घरातल्या वागणुकीसाठी खडसावणार आहे.