अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:04 IST2024-12-13T16:02:35+5:302024-12-13T16:04:42+5:30

'बेबी जॉन' च्या प्रमोशनवेळी वरुण धवनने दिली प्रतिक्रिया

Varun Dhawans reaction after Allu Arjun s arrest says blame cant be on one person | अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..."

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..."

'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) पोलिसांनी अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ च्या हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या प्रीमिअरला एक दुर्घटना घडली. प्रीमिअरसाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याच प्रकरणी आज अल्लू अर्जुनलाहीअटक करण्यात आली आहे. त्याला जामीन मिळणार की नाही यावर थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ इतर कलाकार आले आहेत. नुकतंच वरुण धवनने (Varun Dhawan) यावर आपली प्रतिक्रियी दिली आहे.

वरुण धवन सध्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. यावेळी त्याला अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला,"सुरक्षेसंदर्भात सगळीकडे नियम असतात त्याचं पालन केलं पाहिजे. पण प्रत्येकबाबतीत कलाकाराची जबाबदारी नसते. पण आपण आयोकांना नक्कीच सांगू शकतो. जसं की सध्या आपण ज्या इव्हेंटला आलो आहोत याचं खूप चांगलं आयोजन करण्यात आलं आहे. पण जी दुर्घटना घडली ती नक्कीच दु:खद आहे आणि मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. पण अशा वेळी तुम्ही केवळ एकावरच आरोप करु शकत नाही."


अल्लू अर्जुन सध्या हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये आहे. त्याची मेडिकल करण्यात आली असून थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी आहे. अल्लू अर्जुनवर भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी थिएटरचा मालक आणि त्याच्या मॅनेजरलाही अटक केली.

Web Title: Varun Dhawans reaction after Allu Arjun s arrest says blame cant be on one person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.