उर्वशीचा ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत विचित्र डान्स; नेटकरी संतापून म्हणाले, 'कोण हा कोरिओग्राफर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:44 IST2025-01-03T16:43:41+5:302025-01-03T16:44:27+5:30
एवढा मोठा अभिनेता अभिनेत्रीसोबत अशा प्रकारच्या स्टेप्स कशा करु शकतो असा सवाल विचारला आहे.

उर्वशीचा ३४ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत विचित्र डान्स; नेटकरी संतापून म्हणाले, 'कोण हा कोरिओग्राफर...'
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. सध्या ती तिच्या एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी 'डाकू महाराज' या दाक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सुपरस्टार अभिनेते नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमातील त्यांचं एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यातील डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी कोरिओग्राफरला चांगलंच सुनावलं आहे. तसंच एवढा मोठा अभिनेता अभिनेत्रीसोबत अशा प्रकारच्या स्टेप्स कशा करु शकतो असा सवाल विचारला आहे.
'डाकू महाराज' सिनेमातलं 'डिबिडी डिबिडी' असं हे गाणं आहे. साऊथमधील सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण हे ६४ वर्षांचे आहेत. या वयात त्यांनी उर्वशी रौतेलासोबत केलेल्या डान्स स्टेप्स पाहून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेटकरी गाण्याला आणि यातील डान्स स्टेप्सला खूप ट्रोल करत आहेत. उर्वशीनेही अशा स्टेप्सला कसा होकार दिला असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
What on earth did I just watch? 🤮🤮 A grown man dancing so inappropriately with someone who could be his daughter?
— Mastikhor 🤪 (@ventingout247) January 2, 2025
Who even comes up with such 'genius' choreography, and why did the hero agree to this? Absolutely disgusting🙏🏻🙏🏻#DabidiDibidi#DaakuMaharaajpic.twitter.com/BlENomwL0A
शेखर मास्टर यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. गाण्याच्या डान्स स्टेप्स अगदीच विचित्र आहेत. बालकृष्ण हे उर्वशीपेक्षा ३४ वर्षांनी मोठे आहेत. त्यांना हे शोभत नाही असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.'व्हल्गर','विचित्र' अशा कमेंट्स या गाण्यावर आल्या आहेत. नेटकऱ्यांनी गाण्यावर आक्षेपच घेतला आहे. त