"थलपतीला सांगा…" चाहत्याच्या विनंतीवर तृषा कृष्णन लाजली; विजय यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:22 IST2026-05-16T13:19:27+5:302026-05-16T13:22:30+5:30

थलापती विजय यांचं नाव घेत चाहत्यानं तृषा कृष्णनला केली खास विनंती, अभिनेत्री लाजली!

Trisha Krishnan Blushes After Fans Mention Thalapathy Vijay Video Viral | "थलपतीला सांगा…" चाहत्याच्या विनंतीवर तृषा कृष्णन लाजली; विजय यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा जोर

"थलपतीला सांगा…" चाहत्याच्या विनंतीवर तृषा कृष्णन लाजली; विजय यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा जोर

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांनी राजकारणात प्रवेश करत तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या ऐतिहासिक यशानंतर आता त्यांची कथित गर्लफ्रेंड आणि लोकप्रिय अभिनेत्री तृषा कृष्णन प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच तृषाचा 'करुप्पू' हा चित्रपट १५ मे रोजी  थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी तृषा थिएटरमध्ये पोहोचली असता, चाहत्यांनी तिला घेरले. यावेळी एका चाहत्यानं तिला थेट मुख्यमंत्री विजय यांच्यापर्यंत एक निरोप पोहचवण्याची विनंती केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

थिएटरबाहेर तृषाच्या कारभोवती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेक जण तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. याच गर्दीतून एका चाहत्याने हसत तृषाला म्हटले, "थलापतीला सांगा मी त्यांची विचारपूस केली". हे ऐकताच तृषाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती लाजत तमिळ भाषेत म्हणाली, "कंडिपा" (म्हणजेच नक्की सांगेन). तृषाचा हा लाजाळू अंदाज पाहून सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आता अधिक उधाण आले आहे.

दरम्यान, गेल्या रविवारी विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात तृषा तिची आई उमा कृष्णन यांच्यासोबत उपस्थित राहिली होती. जेव्हा विजय तमिळनाडूच्या विकासाच्या योजना लोकांसमोर मांडत होते, तेव्हा तृषा अत्यंत भावुक झालेली दिसली. लोक टाळ्या वाजवत असताना तृषाच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हसू होते. एवढेच नव्हे तर, या सोहळ्यातील एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तृषा विजय यांच्या आई शोभा यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.

विजय यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?
तृषाचा २०१५ मध्ये उद्योगपती वरुण मणियनसोबत साखरपुडा झाला होता, परंतु काही कारणास्तव तो मोडला. दुसरीकडे, विजय यांनी १९९९ मध्ये संगीता सोर्नालिंगम यांच्याशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले असून संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. विजय यांचे एका अभिनेत्रीशी संबंध असल्याचा आरोप तिने केल्याचे म्हटले जात आहे. 

Web Title : थलपति को कहो… प्रशंसक के अनुरोध पर तृषा कृष्णन शरमाईं, विजय के रिश्ते की अफवाहें फिर उठीं।

Web Summary : विजय की राजनीतिक सफलता के बाद, अभिनेत्री तृषा कृष्णन सुर्खियों में हैं। एक प्रशंसक के विजय को शुभकामनाएं देने के अनुरोध पर तृषा शरमाईं, जिससे रिश्ते की अफवाहें तेज हो गईं। वह अपनी माँ के साथ उनके शपथ ग्रहण समारोह में शामिल हुईं, स्पष्ट रूप से भावुक थीं और बाद में विजय की माँ को गले लगाते हुए देखी गईं। विजय के विवाह और कथित संबंध को लेकर अटकलें हैं।

Web Title : Trisha Krishnan blushes at fan request, Vijay relationship rumors resurface.

Web Summary : Following Vijay's political success, actress Trisha Krishnan is in the spotlight. A fan's request to convey greetings to Vijay made Trisha blush, fueling relationship rumors. She attended his swearing-in ceremony with her mother, visibly emotional and later seen hugging Vijay's mother. Speculation surrounds Vijay's marriage and alleged affair.