थलपति विजयचे विवाहबाह्य संंबंध सर्वांसमोर आले? 'या' अभिनेत्रीसोबत खुलेआम रिसेप्शनला पोहोचताच चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:01 IST2026-03-06T09:58:04+5:302026-03-06T10:01:37+5:30
जिच्यासोबत अफेअरच्या चर्चा तिच्यासोबत रिसेप्शनला पोहोचला थलापति विजय, कोण आहे ती अभिनेत्री? बॉलिवूडमध्येही केलंय काम

थलपति विजयचे विवाहबाह्य संंबंध सर्वांसमोर आले? 'या' अभिनेत्रीसोबत खुलेआम रिसेप्शनला पोहोचताच चाहते थक्क
दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजय सध्या घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आहे. थलपति आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. थलपतिच्या चाहत्यांना यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. थलपतिचे एका अभिनेत्रीसोबतचे विवाहबाह्य संंबंध हे कारण यामागे सांगितलं जातंय. ज्या अभिनेत्रीसोबत थलपतिचं अफेअर आहे, तिच्याचसोबत थलपति एका रिसेप्शनमध्ये एकत्र दिसला. त्यामुळे थलपतिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. कोण आहे ती?
थलपति आणि 'ती' एकत्र
निर्माते कलपति सुरेश यांच्या मुलाच्या थलपति विजयने हजेरी लावली. त्यावेळी थलपतिसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसून आली. थलपति आणि त्रिशा यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. थलपतिच्या घटस्फोटाचं कारणही हेच मानलं जातंय. अशातच सर्व चर्चांना न जुमानता थलपति त्रिशासोबत या रिसेप्शनला पोहोचला. इतकंच नव्हे दोघांनी एकत्र फोटोशूटही केलं. या दोघांना एकत्र पाहताच सर्वजण थक्क झाले. थलपति आणि त्रिशाची जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
थलपतिच्या घटस्फोटाची चर्चा
साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं त्रिशा कृष्णनसोबत एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्रिशा कृष्णन ४२ वर्षांची असून थलपति विजयसोबत तिने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. घिली, आथी, कुरुवी, थिरुपची या सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लिओ सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं होतं.