आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:04 IST2024-04-11T15:04:07+5:302024-04-11T15:04:27+5:30
आईसाठी साईभक्त असल्याने विजयने तिच्यासाठी साईबाबांचं खास मंदिर बांधलंय, वाचा सविस्कर क्लिक करुन (thalapathy vijay, saibaba)

आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर
साऊथ सुपरस्टार कायमच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि साधं राहणीमान या गोष्टींमुळे चर्चेत असतात. हेच सुपरस्टार त्यांच्या फॅन्सची सुद्धा काळजी घेताना दिसतात. नुकतीच साऊथ सुपरस्टार थलापती विजयबद्दल एक खास गोष्ट समोर आलीय. ज्यामुळे तुम्ही विजयवर कौतुकाचा वर्षाव कराल. आईच्या श्रद्धेचा मान राखत विजयने साईबाबांचं भव्य मंदिर उभारलं आहे. तुम्हालाही या मंदिरात जायचंय? तर पुढे वाचा.
थलापती विजयची आई साईबाबांची मोठी भक्त आहे. आई शोभा यांच्यासाठी लेक विजयने साईबाबांच्या मंदिराची निर्मिती केलीय. विजय आणि त्याच्या आईचा मंदिरातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात त्यांच्यासोबत मंदिरातले काही पुजारी सुद्धा पाहायला मिळत आहेत. विजयच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. हे मंदिर कुठे आहे याचीही माहिती समोर आली आहे.
Thalapathy Vijay at Sai Baba Temple. pic.twitter.com/rLKD4xQifZ
— Bharathi (@Bharathistweets) April 8, 2024
तामिळनाडू चेन्नई पश्चिम भागात कोराट्टूर येथे विजयने साईबाबांचं हे मंदिर उभारलं आहे. स्वतःच्या जमिनीवर विजयने या मंदिराची निर्मिती केली आहे. असंही सांगण्यात येतंय या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आली त्यावेळचे हे फोटो आहेत. विजयची आई हिंदू तर बाबा ख्रिश्चन आहेत. विजय सध्या GOAT सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.