विजयकांत यांच्या निधनानंतर सोनू सूद भावूक, पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:51 IST2023-12-28T12:46:02+5:302023-12-28T12:51:36+5:30

विजयकांत यांच्या निधनानंतर साऊथ इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.

Sonu Sood condolence message for south superstar Vijaykanth shared emotional post | विजयकांत यांच्या निधनानंतर सोनू सूद भावूक, पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

विजयकांत यांच्या निधनानंतर सोनू सूद भावूक, पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

साऊथ मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत (Vijaykanth) यांचं (२८ डिसेंबर) गुरुवार रोजी निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर ते श्वसनाच्या त्रासामुळे व्हेंटिलेटरवर होते. १४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजयकांत यांच्या निधनानंतर साऊथ इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदी तसेच साऊथ अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) विजयकांत यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेते विजयकांत यांचं वय 71 वर्षं होतं. गेल्या १४ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सोनू सूदने त्यांचा फोटो शेअर करत लिहिले,'कल्लाझगर माझा करिअरमधला पहिलाच चित्रपट. विजयकांत सरांनी मला दिलेलं हे गिफ्टच होतं. त्यांनी माझा एक फोटो पाहिला आणि पुढच्या काही दिवसात मी त्यांच्यासोबत फिल्म शूट करत होतो. माझ्या करिअरचं संपूर्ण श्रेय त्यांनाच जातं. सर तुमची कायम आठवण येत राहील. RIP कॅप्टन'

सोनू सूदला अभिनयात पहिला ब्रेक देणारे विजयकांतच होते. सोनूने 'कल्लाझगर' या तमिळ सिनेमातून डेब्यू केला. हिंदीपेक्षा जास्त साऊथ सिनेमांमध्येच त्याने भूमिका साकारल्या आहेत. विजयकांत यांच्या निधनानंतर सोनू भावूक झाला आहे. याशिवाय कमल हसन, ज्युनिअर एनटीआरसह अनेक कलाकारांनी विजयकांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Web Title: Sonu Sood condolence message for south superstar Vijaykanth shared emotional post