रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 08:41 IST2026-02-28T08:40:01+5:302026-02-28T08:41:46+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांत रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे

Rashmika Vijay gave good news two days after their wedding ranabaali movie new poster | रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांत रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आलंय.

ही गूड न्यूज काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सांगतो तर त्याचं उत्तर सांगतो. हे नवनिर्वाचित जोडपे आता खऱ्या आयुष्यानंतर पुन्हा एकदा रील लाईफमध्ये एकत्र दिसणार आहे. त्यांच्या आगामी 'राणाबली' (Ranabaali) या चित्रपटाचा एक नवा आणि खास पोस्टर निर्मात्यांनी प्रदर्शित केला असून, आज चाहत्यांना एक विशेष सरप्राईज मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.

पोस्टरमध्ये दिसली 'राणाबली' आणि 'जयम्मा'ची केमिस्ट्री

'मैत्री मूव्ही मेकर्स'ने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य पात्रे 'राणाबली' (विजय) आणि 'जयम्मा' (रश्मिका) एकमेकांचा हात धरलेले दिसत आहेत. जरी या पोस्टरमध्ये त्यांचे चेहरे पूर्णपणे दिसत नसले, तरी त्यांच्यातील केमिस्ट्रीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. "आमचे राणाबली आणि जयम्मा... २८ फेब्रुवारीला एका खास सरप्राईजसह... तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडाल," असे कॅप्शन निर्मात्यांनी दिले आहे.


१८ व्या शतकातील ऐतिहासिक पार्श्वभूमी

'राणाबली' सिनेमात केवळ एक प्रेमकथा नसून, तो १८ व्या शतकातील रायलसीमा भागाच्या इतिहासावर आधारित एक भव्य ऐतिहासिक थरारपट आहे. राहुल संकृत्यान दिग्दर्शित या चित्रपटात ब्रिटिश काळातील संघर्ष आणि शोषण दाखवण्यात येणार आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'च्या प्रचंड यशानंतर विजय आणि रश्मिका पुन्हा एकदा एकत्र येत असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.


आज निर्माते या चित्रपटाचे पहिले गाणे किंवा एखादा छोटा टीझर प्रदर्शित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, कालच (२६ फेब्रुवारी) या जोडीने उदयपूरमध्ये लग्न केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटाची ही अपडेट आल्याने चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने डबल सेलिब्रेशन ठरलं आहे. 'राणाबली' हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरात विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड वोस्लू (Arnold Vosloo) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.

Web Title : रश्मिका और विजय ने शादी के बाद नई फिल्म 'राणाबाली' की घोषणा की।

Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना ने अपनी आगामी फिल्म 'राणाबाली' की घोषणा कर प्रशंसकों को खुश कर दिया। शादी के तुरंत बाद आई इस खबर से 18वीं सदी के ऐतिहासिक थ्रिलर के लिए उत्साह बढ़ गया है।

Web Title : Rashmika and Vijay announce new film 'Ranabaali' after wedding.

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna delighted fans by announcing their upcoming film 'Ranabaali' shortly after their rumored wedding. A new poster has been released, increasing excitement for the historical thriller set in the 18th century.