'या' खास ठिकाणी हनिमूनला गेलेत रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा, रोमँटिक फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:45 IST2026-03-22T15:42:31+5:302026-03-22T15:45:08+5:30
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे शूटिंगच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत या खास ठिकाणी हनिमूनला गेलेत

'या' खास ठिकाणी हनिमूनला गेलेत रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा, रोमँटिक फोटो व्हायरल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. सध्या हे दोघेही हनिमूनचा आनंद घेत आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे थायलंडमधील 'कोह सामुई' (Koh Samui) येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले आहे. तिथला त्यांचा एक रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रश्मिका आणि विजयने त्यांच्या हनिमूनसाठी एका खासगी बीचसाइड ठिकाणाची निवड केली आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये विजय आणि रश्मिका थायलंडमधील एका जागेवर एकमेकांकडे पाहत हसताना दिसत आहेत. विजयने साधा टी शर्ट परिधान केला असून रश्मिका पिवळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यांच्या भोवतालचं निसर्गरम्य वातावरण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघांनी रोमँटिक अंदाजात एकमेकांना मिठी मारलेली दिसते.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका आणि विजयला त्यांचे खासगी क्षण गर्दीच्या ठिकाणापासून दूर घालवायचे होते. म्हणूनच त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या एका खास जागेची निवड केली. त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांनी आपल्या हनिमूनसाठी लोकांची गर्दी टाळून शांत ठिकाण निवडलं आहे.
रश्मिका आणि विजयने उदयपूरमधील 'आयटीसी मेमेंटोस' (ITC Mementos) येथे तेलगू आणि कोडवा (कूर्गी) अशा दोन्ही परंपरांनुसार लग्न केले होते. त्यानंतर ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी आणि राजकीय नेत्यांसाठी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहते खूप आनंदी आहेत.
हनिमूनवरून परतल्यानंतर रश्मिका 'मैसा' (Mysaa) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. तसेच, हे जोडपे लवकरच 'रणबाली' या चित्रपटात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.