एकमेकांचा हात हातात घेऊन संगीत सोहळ्यात पोहोचले रश्मिका-विजय; व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:03 IST2026-02-26T09:01:26+5:302026-02-26T09:03:07+5:30

या संगीत सोहळ्यात रश्मिका आणि विजयने एकमेकांचा हात हातात घेऊन एन्ट्री केली. दोघांमधलं प्रेम यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळालं. रश्मिकाने या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेस परिधान केला होता.

Rashmika mandanna Vijay devarakonda reached the music festival holding hands; Photo goes viral | एकमेकांचा हात हातात घेऊन संगीत सोहळ्यात पोहोचले रश्मिका-विजय; व्हिडीओ आला समोर

एकमेकांचा हात हातात घेऊन संगीत सोहळ्यात पोहोचले रश्मिका-विजय; व्हिडीओ आला समोर

आज रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा एकमेकांशी थाटामाटात लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच लग्नाआधी या दोघांचा काल संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात रश्मिका आणि विजयने एकमेकांचा हात हातात घेऊन एन्ट्री केली. दोघांमधलं प्रेम यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळालं. रश्मिकाने या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेस परिधान केला होता.

रश्मिका-विजयचा संगीत सोहळ्यातील फोटो व्हायरल

रश्मिका आणि विजयचा संगीत सोहळा चांगलाच चर्चेत होता. मी या सोहळ्यातील त्यांचा एक फोटो समोर आला आहे. याशिवाय मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांनी संगीत सोहळ्यात लोकनृत्यावर आधारीत एक डान्स परफॉर्मन्स केला आहे. यावेळी संगीत सोहळ्यात विजय-रश्मिकाचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं. याशिवाय मित्र-मैत्रिणींनीही सहभाग घेतला होता. याच संगीत सोहळ्यात रश्मिका-विजय एकमेकांचा हात हातात घेताना दिसले. यावेळी रश्मिकाने सिल्व्हर रंगाचा लेहंगा तर विजयने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.


दोघांच्या लग्नाचा मुहुर्त काय?

विजय आणि रश्मिकाच्या लग्नाचा मुहूर्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता निश्चित करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न तेलुगू आणि कोडावा (Kodava) या दोन्ही संस्कृतींच्या रीतिरिवाजांनुसार पार पडणार आहे. तर बुधवारी हळद आणि मेहंदी समारंभ पार पडले, ज्यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Web Title : रश्मिका और विजय संगीत समारोह में हाथ में हाथ डालकर पहुंचे: वीडियो आया सामने

Web Summary : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा का प्री-वेडिंग संगीत समारोह हुआ, जिसमें युगल हाथ में हाथ डाले नजर आए। कार्यक्रम में एक लोक नृत्य प्रदर्शन किया गया और इसमें परिवार और दोस्त शामिल हुए। रश्मिका ने सिल्वर लहंगा पहना था, जबकि विजय ने काली शेरवानी पहनी थी। उनकी शादी तेलुगु और कोडावा परंपराओं के अनुसार होने की उम्मीद है।

Web Title : Rashmika and Vijay Arrive Hand-in-Hand at Sangeet Ceremony: Video Surfaces

Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Devarakonda's pre-wedding Sangeet ceremony took place, with the couple holding hands. The event featured a folk dance performance and was attended by family and friends. Rashmika wore a silver lehenga, while Vijay sported a black sherwani. Their wedding is expected to follow Telugu and Kodava traditions.