सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2" ची रिलीज डेट बदलणार? सिनेमासंदर्भात मोठं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:04 IST2024-01-25T13:59:06+5:302024-01-25T14:04:46+5:30
'पुष्पा: द रूल' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

"पुष्पा 2" ची रिलीज डेट बदलणार? तब्येत खालावल्याने अल्लू अर्जुनने कामातून घेतला ब्रेक
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा-2 म्हणजेच 'पुष्पा: द रूल' (Pushpa The Rule) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. कारण, आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे. बातमी येत आहे की अल्लू अर्जुनने तब्येतीची काळजी घेण्यासाठी चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन सलग 'पुष्पा 2' चे शूटिंग करत होता. ज्यामुळे त्याला काही आरोग्य समस्यांना सामोरे जावं लागलं. म्हणून अल्लू अर्जुनने तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामातून ब्रेक घेतला. काही दिवस विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. यामुळे 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन वेळेवर पूर्ण होणार नाही. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना आता अजून प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित. 'पुष्पा 2' हा चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं.
'पुष्पा: द राइज' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) तुम्ही 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट पाहू शकता. अल्लु अर्जुनला 'पुष्पा'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर 'पुष्पा: द रुल'मध्ये अल्लू अर्जुन, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू, अनुसया भारद्वाज हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.