विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:06 IST2026-02-27T12:03:38+5:302026-02-27T12:06:04+5:30

नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतंच लग्नबंधनात अडकले. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे.

On the day of Vijay-Rashmika wedding famous actor allu sirish announced his wedding date | विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

विजय-रश्मिकाच्या लग्नाच्या दिवशीच आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने जाहीर केली लग्नाची तारीख, कोण आहे तो?

नुकतंच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतंच लग्नबंधनात अडकले. दोघांच्या शाही लग्नाची चांगलीच चर्चा झाली. जणू शिव-पार्वतीचं मिलन अशा शब्दांत रश्मिका-विजयच्या लग्नावर लोकांनी कमेंट्स केल्या. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. हा अभिनेता आहे अल्लू शिरीष.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा लहान भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेता अल्लू शिरीष लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शिरीषने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाची तारीख आणि प्री-वेडिंग सोहळ्यांची अधिकृत माहिती दिली आहे. शिरीष आपली दीर्घकाळाची मैत्रीण नयनिका रेड्डी हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे.

अल्लू शिरीष आणि नयनिका रेड्डी यांचं लग्न ६ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी शिरीषचा मोठा भाऊ अल्लू अर्जुन आणि वहिनी स्नेहा रेड्डी यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आपल्या भावाच्या लग्नाच्या वाढदिवशीच स्वतःचे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये या 'डबल सेलिब्रेशन'ची मोठी चर्चा आहे.


प्री-वेडिंग सोहळ्यांचे नियोजन

शिरीषने दिलेल्या माहितीनुसार, विवाह सोहळा अतिशय खाजगी स्वरूपाचा असेल, ज्यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहतील. मात्र, तेलगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी २ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील 'अल्लू स्टुडिओ'मध्ये एका भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे.

लग्नापूर्वीचे विधी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच सुरू झाले आहेत. नुकतीच त्यांच्या घरी पारंपारिक 'पसुपू' (हळद दळण्याचा विधी) सोहळा पार पडला. यापूर्वी दुबईमध्ये एका आलिशान क्रूझवर 'यॉट पार्टी'चेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच, अल्लू अर्जुनने आपल्या फार्महाऊसवर या जोडीसाठी एका खास कॉकटेल पार्टीचेही आयोजन केले होते. अल्लू शिरीष आणि नयनिका यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये साखरपुडा केला होता.

Web Title : विजय-रश्मिका की शादी के दिन अल्लू शिरीष ने भी की शादी की घोषणा

Web Summary : रश्मिका और विजय की शादी के बाद, अल्लू शिरीष ने नायनिका रेड्डी से 6 मार्च, 2026 को शादी करने की घोषणा की, जो उनके भाई अल्लू अर्जुन की शादी की सालगिरह है। शादी से पहले हैदराबाद में उत्सव और दुबई में एक यॉट पार्टी होगी।

Web Title : Allu Sirish Announces Wedding Date on Vijay-Rashmika's Wedding Day

Web Summary : Following Rashmika and Vijay's wedding, Allu Sirish announced his marriage to Nayanika Reddy on March 6, 2026, his brother Allu Arjun's anniversary. Pre-wedding festivities include a celebration in Hyderabad and a yacht party in Dubai.