सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:13 IST2025-06-06T12:11:59+5:302025-06-06T12:13:05+5:30
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. भीषण अपघातात अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं असून त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा (shine tom chacko) मोठा अपघात झाला आहे. आज ६ जून रोजी तमिळनाडूच्या धर्मापुरीजवळ अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात शाइनच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे अभिनेत्याचे वडील सी.पी. चॅको यांचा जागीच मृत्यू झाला. ते ७० वर्षांचे होते. याशिवाय अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं.
शाइन टॉम चाकोचा अपघात
हा अपघात इतका भीषण होता की, अभिनेता शाइन , त्याची आई, भाऊ आणि ड्रायव्हर या सर्वांना जखमी अवस्थेत तातडीने पालाकोट्टई जर्नल मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शाइनचा उजवा हात या अपघातात फ्रॅक्चर झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय इतरांना किरकोळ जखम झाली आहे. परंतु या अपघातात अभिनेत्याच्या वडीलांनी जागीच जीव गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेमुळे मल्याळम चित्रपटसृष्टी आणि अभिनेत्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हा अपघात अपघात नेमका कसा घडला, याची पोलीस तपासणी करत आहेत. शाइन टॉम चाकोने ‘जिगरथंडा डबल एक्स’, ‘दसरा’ आणि ‘गुुड बॅड अग्ली’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याच्या वडिलांच्या निधनामुळे अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाला चाहते धीर देत आहेत. या अपघाताच्या धक्क्यातून शाइन आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब लवकरात लवकर सावरेल, अशी सर्वांना आशा आहे.