"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं?
By देवेंद्र जाधव | Updated: April 29, 2025 12:20 IST2025-04-29T12:19:39+5:302025-04-29T12:20:46+5:30
कमल हासन यांनी 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नम यांच्यासमोर जाहीर कबुली दिली. काय म्हणाले कमल हासन बघा (thug life)

"ती आमची चूकच झाली.."; कमल हासन यांची सर्वांसमोर जाहीर कबुली, 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला काय घडलं?
काहीच दिवसांपूर्वी 'ठग लाईफ' सिनेमाचं (thug life movie) पहिलं गाणं लाँच झालं. चेन्नईमध्ये सर्व कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत 'ठग लाईफ' सिनेमाचं हे खास गाणं लाँच करण्यात आलं. 'ठग लाईफ' सिनेमाच्या या खास इव्हेंटला कमल हासन (kamal haasan) यांचे चाहतेही उपस्थित होते. या इव्हेंटला कमल हासन यांचा स्टायलिश अंदाज सर्वांचं लक्ष वेधून गेला. या इव्हेंटला 'ठग लाईफ' सिनेमाचे दिग्दर्शक मणी रत्नम उपस्थित होते. त्यावेळी मणी रत्नम (mani ratnam) यांच्यासमोर कमल हासन यांनी सर्वांसमोर एक जाहीर कबुली केली. काय म्हणाले?
ती माझी चूकच झाली: कमल हासन
'ठग लाईफ' सिनेमातील पहिलं गाणं 'जिंगुचा' काही दिवसांपूर्वी लाँच झालं. यावेळी कमल हासन भावना व्यक्त करताना म्हणाले की, "ठग लाईफ हा असा सिनेमा आहे जो मला स्वतःला बघायला आवडेल. मला आनंद आहे की, मी या सिनेमात अभिनय केला आणि या सिनेमाची निर्मितीही केली. प्रेक्षकांनी आजवर जे भरपूर प्रेम दिलंय त्या प्रेमानेच हा सिनेमा बनवला आहे."
पुढे मणी रत्नम यांच्याविषयी बोलताना कमल हासन म्हणाले की, "आम्ही नायकन या सिनेमात पहिल्यांदा एकमेकांसोबत काम केलं. तेव्हापासून आतापर्यंत इतक्या वर्षात काही बदललं नाही. आम्ही मोठी स्वप्न पाहिली होती पण सध्याचा इंडस्ट्रीचा बाजार आणि आर्थिक बजेट यामुळे आम्हाला सोबत काम करता येत नव्हतं. नायकन सिनेमानंतर आम्ही एकत्र काम केलं नाही ही आमची चूक झाली. परंतु आता आम्ही एकत्र आलोय ते फक्त आणि फक्त प्रेक्षकांमुळे." अशाप्रकारे कमल हासन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
चेन्नईमधील कलईवनर आरंगम सभागृहात (Kalaivanar Arangam) 'ठग लाईफ' सिनेमाच्या पहिल्या गाण्याचं शानदार लाँचिंग झालं. या सोहळ्याला मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि इतर भागांमधून पत्रकार उपस्थित होते. 'ठग लाईफ'च्या संपूर्ण टीमने सर्वांचं उत्तम आदरातिथ्य करुन एक लक्षात राहील अशा सोहळ्याचं आयोजन केलं होतं. हा सिनेमा ५ जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.