घटस्फोटानंतर समांथाला इंडस्ट्रीने बॉयकॉट केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:07 IST2025-09-17T15:04:15+5:302025-09-17T15:07:20+5:30
एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या विधानाने समांथाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे

घटस्फोटानंतर समांथाला इंडस्ट्रीने बॉयकॉट केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली-
प्रसिद्ध अभिनेत्री समांथाचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. अभिनेता नागा चैतन्यसोबत समांथाने घटस्फोट घेतला. त्यामुळे नागा आणि समांथाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. अशातच तेलुगु अभिनेत्री लक्ष्मी मांचूने एका मुलाखतीत, नाव न घेता एका अभिनेत्रीला घटस्फोटानंतर खूप त्रास सहन करावा लागला. तिला इंडस्ट्रीने ब्लॅकलिस्ट केलं, असं सांगितलं. त्यामुळे चाहत्यांनी लक्ष्मी मांचूचा रोख समांथा रुथ प्रभूकडे आहे, असं बोललं जातंय.
मुलाखतीत अभिनेत्री लक्ष्मी मांचूने सांगितलं की, ''घटस्फोटानंतर अभिनेत्रीला कामापासून दूर ठेवलं जात आहे आणि तिला 'ब्लॅकलिस्ट' करण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर तिच्याकडून आधीचे साइन केलेले चित्रपटही काढून घेतले गेले आहेत. समाजात पुरुषांपेक्षा महिलांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवलं जातं, तर पुरुषांच्या चुका सहज विसरल्या जातात.'' लक्ष्मी मांचू यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बघता, समांथाला घटस्फोटानंतर इंडस्ट्रीने बॉयकॉट केलंय का? अशी चर्चा आहे.
समांथाचं सध्याचं आयुष्य
२०१७ साली समांथा रुथ प्रभूने अभिनेता नागार्जुनचा मुलगा आणि सुपरस्टार नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. दोघांची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेचा विषय होती. परंतु २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर समांथा सिनेमात इतकी दिसली नाही. याशिवाय तिचे जे सिनेमे आले ते सुद्धा इतके चालले नाहीत. सध्या समांथा सिंगल नसली तरीही ती दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करतेय, अशी चर्चा आहे. समांथा आणि राज एकत्र भटकंती करताना आणि मॅच पाहताना दिसले. परंतु दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपचा जाहीर खुलासा केला नाहीये.