जुळी भावंडं, एकाचा मृत्यू अन् चक्रावून टाकणारं रहस्य! १ तास ५२ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहून काळजाचा ठोका चुकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:52 IST2025-01-13T13:50:34+5:302025-01-13T13:52:20+5:30

साधारण २ तासांचा हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

iratta movie story ending explained starring joju george netflix malyalam movie | जुळी भावंडं, एकाचा मृत्यू अन् चक्रावून टाकणारं रहस्य! १ तास ५२ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहून काळजाचा ठोका चुकेल

जुळी भावंडं, एकाचा मृत्यू अन् चक्रावून टाकणारं रहस्य! १ तास ५२ मिनिटांचा 'हा' सिनेमा पाहून काळजाचा ठोका चुकेल

सध्या मल्याळम सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. 'मंज्युमल बॉइज', 'आवेशम', 'किश्किंधा कांडम' असे अनेक सिनेमे चांगलेच गाजले. या सिनेमांच्या रहस्यमयी थ्रिलर विषयांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. अशातच अशा विषयाचे सिनेमे पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक सिनेमा सजेस्ट करणार आहोत. जो पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. या सिनेमाचं नाव काय? सिनेमा कुठे बघायला मिळेल? जाणून घ्या सविस्तर

जुळी भावंडं, एकाचा मृत्यू अन्...

२०२३ साली साउथमध्ये रिलीज झालेला सस्पेन्स थ्रिलर 'इरट्टा' चांगलाच गाजला. या सिनेमाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सिनेमाचं कथानक एकदम रहस्यमयी आहे. दोन जुळी भावंंडं असतात. त्यापैकी एक पोलीस अधिकारी असतो. ड्युटीदरम्यान त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्याचा जुळा भाऊ भावाच्या हत्येचा कसून तपास करतो. हा तपास करताना अनेक रहस्यमयी घटनांचा पर्दाफाश होतो. सिनेमाचा शेवट पाहून तुम्हीही चक्रावून जाल आणि तुमच्या अंगावर काटा उमटल्याशिवाय राहणार नाही.

कुठे बघाल इरट्टा?

'इरट्टा' सिनेमा २०२३ साली रिलीज झालेला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तितकी कमाल केली नाही. परंतु सिनेमा ऑनलाइन असल्यावर अनेक लोकांनी हा सिनेमा पाहिला आणि त्यांना आवडला. IMDB वर या सिनेमाला ७.७ रेटिंग आहे. सिनेमात जोजू जॉर्ज यांनी जुळ्या भावंडांचा डबल रोल केलाय. याशिवाय मीनाक्षी दिनेश, पूजा मोहनराज या कलाकारांची सिनेमात खास भूमिका आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

 

Web Title: iratta movie story ending explained starring joju george netflix malyalam movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.