अबब! १० कोटीत बांंधलेलं घर तब्बल १०० कोटींमध्ये विकलं; 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराची इंडस्ट्रीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:24 IST2026-04-12T12:21:57+5:302026-04-12T12:24:18+5:30

अभिनेत्रीला घराची विक्री करताना तब्बल ९० कोटींचा नफा झाला. काय आहे या घरामध्ये खास? वाचून तुम्हीही चकीत व्हाल

drishyam actress meena sagar house built for 10 crores was sold for a 100 crores | अबब! १० कोटीत बांंधलेलं घर तब्बल १०० कोटींमध्ये विकलं; 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराची इंडस्ट्रीत चर्चा

अबब! १० कोटीत बांंधलेलं घर तब्बल १०० कोटींमध्ये विकलं; 'दृश्यम' अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराची इंडस्ट्रीत चर्चा

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'दृश्यम' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री मीना सागर (Meena Sagar) सध्या चर्चेत आली आहे. मीनाचे चेन्नईतील आलिशान घर तब्बल १०० कोटी रुपयांना विकले गेले असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे. विशेष म्हणजे फक्त १० कोटी रुपयांत बांधलेलं घर १०० कोटींत विकलं जाणं, हे ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. जाणून घ्या सविस्तर

मीनाने काही वर्षांपूर्वी चेन्नईतील हे घर केवळ १० कोटी रुपये खर्चून बांधले होते. जर या चर्चा खऱ्या असतील, तर मीनाला या व्यवहारातून तब्बल ९० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे घर चेन्नईतील एका प्रसिद्ध वस्तीत असून त्याचे इंटेरिअर आणि घरातील सुविधा अतिशय भव्य आहेत. मीनाच्या आईने घराचं डिझाईन करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या घरात केरळ शैलीतील मोठे खांब, घरासमोर भव्य अंगण याशिवाय तंजावरमधील पारंपरिक कलाकृती आहेत. अमेरिकेतील NRI कपलने हे घर १०० कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.  

मात्र, या १०० कोटींच्या व्यवहाराबाबत अद्याप अभिनेत्री मीना किंवा तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मीना गेल्या अनेक दशकांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय असून तिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. रजनीकांत, कमल हासन आणि मोहनलाल यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत तिने काम केले आहे. सध्या मनोरंजन विश्वात मीनाच्या घराची जी १०० कोटी रुपयांत डील झाली त्याचीच चर्चा होत आहे.

Web Title : 'दृश्यम' अभिनेत्री मीना का घर भारी मुनाफे में बिका: रिपोर्ट

Web Summary : अभिनेत्री मीना सागर का चेन्नई स्थित घर, जो ₹10 करोड़ में बना था, कथित तौर पर ₹100 करोड़ में बिका, जिससे इंडस्ट्री में चर्चा है। शानदार घर में केरल शैली की वास्तुकला और पारंपरिक कला है। एक एनआरआई जोड़े ने कथित तौर पर संपत्ति खरीदी, हालांकि आधिकारिक पुष्टि का इंतजार है।

Web Title : 'Drishyam' Actress Meena's House Sold for Huge Profit: Report

Web Summary : Actress Meena Sagar's Chennai house, built for ₹10 crore, reportedly sold for ₹100 crore, creating industry buzz. The lavish house boasts Kerala-style architecture and traditional art. An NRI couple purportedly bought the property, though official confirmation is awaited.