'दृश्यम ३' कडून थ्रिलरची अपेक्षा ठेवू नका, दिग्दर्शकाने केलं स्पष्ट; असं का म्हणाले जीतू जोसेफ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:21 IST2025-09-12T11:20:51+5:302025-09-12T11:21:28+5:30
लोकांनी खूप अपेक्षा ठेवली तर निराशा होईल, जीतू जोसेफ यांनी केलं स्पष्ट

'दृश्यम ३' कडून थ्रिलरची अपेक्षा ठेवू नका, दिग्दर्शकाने केलं स्पष्ट; असं का म्हणाले जीतू जोसेफ?
'दृश्यम' (Drishyam) सस्पेन्स थ्रिलरपट तुफान हिट झाला होता. साउथ सिनेमाचा हा रिमेक होता. यानंतर 'दृश्यम २' आला. तोही असाच सस्पेन्सने भरलेला सिनेमा. तर आता 'दृश्यम ३'ची चर्चा आहे. विशेष म्हणजे साउथ आणि हिंदीत दोन्हीकडे हा सिनेमा एकत्रच शूट होणार आहे. मात्र 'दृश्यम'च्या या तिसऱ्या भागात सस्पेन्सची आशा करु नका असं दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून जीतू जोसेफ 'दृश्यम ३'च्या साउथ सिनेमाच्या प्री प्रोडक्शनचं काम करत आहेत. हा या फ्रँचायझीचा अखेरचा सिनेमा असणार आहे. ५ ड्राफ्टवर काम केल्यानंतर त्यांनी एक स्क्रिप्ट फायनल केली आहे. ऑक्टोबरमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, "मी अॅमस्टरडॅमवरुन दुबईला येत होतो तेव्हा फ्लाईटमध्ये याचा ड्राफ्ट तयार केला होता. लँडिंगआधी मी सीन ऑर्डरही पूर्ण केलं होतं. पण माझ्या मुलींच्या पसंतीस पडलं नाही. म्हणून मी सतत रिराईट करत राहिलो. अशा प्रकारे याची गोष्ट फायनल झाली."
ते पुढे म्हणाले, "दृश्यम हा सस्पेन्स, थ्रिल आण टाईट स्टोरीलाईन मुळे ओळखला जातो. पण तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांनी याची जास्त अपेक्षा ठेवू नये. जर लोकांना वाटत असेल की तिसऱ्या भागात दुसऱ्या पार्टसारखंच भारी भक्कम इंटेलिजेंट गेम असेल तर त्यांची निराशा होईल."
काही दिवसांपूर्वीही जीतू जोसेफ यांनी स्पष्ट केलं होतं की ते आता थ्रिलर बनवून थकले आहेत. त्यामुळे आता ते या सिनेमातही थ्रिल आणणार नाहीत. सिनेमाची गोष्ट दुसऱ्या पार्टच्या शेवटापासूनच सुरु होणार आहे.