'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:36 IST2025-09-22T11:35:37+5:302025-09-22T11:36:56+5:30

'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर गेल्यानंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री तिची जागा घेणार आहे. कोण आहे ती?

Deepika Padukone out of the sequel of Kalki 2898 AD anushka shetty will replace her | 'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा?

'कल्की २८९८ एडी'च्या सिक्वलमधून दीपिका पादुकोण बाहेर, आता ही अभिनेत्री घेणार तिची जागा?

'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट चांगला गाजला. दीपिका पादुकोणने या बिग बजेट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. परंतु काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अर्थात 'वैजयंती मूव्हीज'ने अधिकृतपणे जाहीर केलं की, अभिनेत्री दीपिका पदुकोण या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग असणार नाही. यामुळेच दीपिकाला चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता दीपिकानंतर या भव्यदिव्य चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. कोण आहे ती?

ही अभिनेत्री घेणार दीपिकाची जागा 

दीपिकाला या चित्रपटातून काढल्यावर आता तिच्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री कोण असेल, यावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर 'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव सुचवलं आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, प्रभास आणि अनुष्काची जोडी 'बाहुबली' चित्रपटात खूप यशस्वी झाली होती आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे, 'कल्की' च्या सिक्वेलमध्ये जर ही जोडी पुन्हा एकत्र आली तर चित्रपट आणखी यशस्वी होईल. त्यामुळे 'कल्की २८९८ एडी'मध्ये प्रभाससोबतअनुष्का शेट्टी झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सध्या ही केवळ चाहत्यांची मागणी आहे. निर्मात्यांनी अजून अनुष्का शेट्टी किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत ही केवळ एक चर्चाच आहे. दरम्यान दीपिका बाहेर पडल्यामुळे 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. या बिग बजेट चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन, डुलकिर सलमान हे लोकप्रिय कलाकार झळकले. त्यामुळे 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलची सर्वांना उत्सुकता आहे

Web Title: Deepika Padukone out of the sequel of Kalki 2898 AD anushka shetty will replace her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.