आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:37 IST2025-10-29T11:36:45+5:302025-10-29T11:37:13+5:30
दीपिका आणि 'कल्कि'च्या मेकर्समधला वाद सुरुच

आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
अभिनेत्री दीपिका पादुकोणला 'कल्कि 2898 एडी' च्या सीक्वेलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तिच्या काही मागण्या आणि अटींमुळे मेकर्सने हा निर्णय घेतला. सिनेसृष्टीत याची बरीच चर्चा झाली. गेल्या वर्षी दीपिकाने मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर पुन्हा ती 'स्पिरीट' आणि 'कल्कि २' या दोन्ही बिग बजट सिनेमांमध्ये दिसणार होती. मात्र तिने जादा मानधन, प्रॉफिट शेअर आणि ८ तासांची शिफ्ट या मागण्या केल्याने तिला सिनेमातून बाहेर काढण्यात आलं. इतकंच नाही तर आता 'कल्कि 2898 एडी'च्या क्रेडिट्समधूनही दीपिकाचं नाव हटवण्यात आलं आहे. यामुळे दीपिकाचे चाहते चांगलेच भडकले आहेत.
दीपिका पादुकोणत्या एका फॅन पेजवरील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ओटीटीवर उपलब्ध असलेल्या 'कल्कि 2898 एडी' सिनेमाच्या शेवटी क्रेडिट्स लिस्टमधून दीपिकाचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओतून चाहत्याने ही गोष्ट निदर्शनास आणली आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडीओ दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरुन क्रेडिट्स लिस्टमध्ये दीपिकाचं नाव दिसत नाही.
credits aren’t just names at the end of a movie. They’re acknowledgment, accountability, and respect for the work put in. When someone like Deepika Padukone, who’s played a pivotal role in shaping the emotional core of Kalki, isn’t credited even after months of OTT release pic.twitter.com/IcQOe0qSmW
— Dua Padukone (@Duapadukone) October 28, 2025
चाहत्याने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सिनेमातील दीपिकाचा शेवटचा सीन दिसत आहे. यामध्ये ती प्रेग्नंट आहे. नंतर क्रेडिट लिस्ट येते. सुरुवातीला ज्यांनी स्पेशल अपिअरन्स केला आहे त्यांची नावं येतात. नंतर सिनेमाची मुख्य कास्ट अमिताभ बच्चन, पद्मजा, कृष्णकुमार, केया नायर, रसूल, प्रशांत, सविता, राजेंद्र प्रसाद, चंद्रामोहन या सर्वांची नावं येतात. मात्र दीपिकाचं नाव कुठेच दिसत नाही.
या प्रकारावर आता दीपिकाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'मोठं झाल्यावर तो समजूतदार होतात असं मला वाटायचं, पण आता काय बोलणार','दीपिकाला वाईट दाखवण्यासाठी त्यांना पीआर ही करावा लागला नाही. हे लोक उलट स्वत:चाच खरा चेहरा समोर आणत आहेत','असं वाटतंय दीपिकामुळे यांचा मेल इगो दुखावला आहे. हे किती अनप्रोफेशनल आहे' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.