"गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर होते...", थलपती विजय यांच्या दाव्यावर क्लासमेटची टीका, ट्वीट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 18:34 IST2026-05-11T18:34:16+5:302026-05-11T18:34:39+5:30
रविवारी शपथविधी सोहळ्यात थलपती विजय यांनी लहानपणी गरीब परिस्थितीत दिवस काढल्याचं म्हटलं. त्यामुळे भूक म्हणजे काय असतं, याची जाणीव असल्याचंही थलपती विजय म्हणाले होते. मात्र त्यांचे हे दावे चुकीचे असल्याचं त्यांच्याच शाळेतील मित्राने म्हटलं आहे.

"गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर होते...", थलपती विजय यांच्या दाव्यावर क्लासमेटची टीका, ट्वीट व्हायरल
साऊथचा सुपरस्टार असलेले थलपती विजय आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. रविवारी शपथविधी सोहळ्यात थलपती विजय यांनी लहानपणी गरीब परिस्थितीत दिवस काढल्याचं म्हटलं. त्यामुळे भूक म्हणजे काय असतं, याची जाणीव असल्याचंही थलपती विजय म्हणाले होते. मात्र त्यांचे हे दावे चुकीचे असल्याचं त्यांच्याच शाळेतील मित्राने म्हटलं आहे. मनु जोसेफ नावाच्या व्यक्तीने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे.
"तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या पहिल्या भाषणात विजयने असं म्हटलं की तो गरीबीत वाढला आणि भूक म्हणजे काय हे त्याला माहीत आहे. पण हे सगळं खोटं आहे कारण तो माझा क्लासमेट होता. तिसरीत असताना लोयोला शाळेत आम्ही एकत्र होतो. त्याचे वडील फिल्ममेकर होते. आणि त्यांनीच त्याचं करिअरही सिनेइंडस्ट्रीमध्ये सेट केलं. इतर फिल्ममेकरुप्रमाणे कधी कधी त्यांच्याकडे पैसे नसतील, याची शक्यता असू शकते. पण, त्याची तुलना तमिळनाडूतील गरिब जनतेशी होऊ शकत नाही. अनेक श्रीमंत मुलांना पैसे नसणे म्हणजे गरीब असणे असं वाटतं. पण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत", असं मनु जोसेफ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
In his first speech as Tamil Nadu chief minister, Vijay said that he grew up in poverty, and that he even knows what hunger is. It's bullshit because he was my classmate in the third standard in Loyola School.
— Manu Joseph (@manujosephsan) May 11, 2026
His father was a filmmaker who set up his son for a career in films.…
या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण अद्याप थलपती विजय किंवा त्यांच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, थलपती विजय यांनी मुख्यमंत्री होताच 'ॲक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच विजय यांनी जनतेशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. यामध्ये २०० युनिट मोफत वीज, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणं आणि ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी 'स्पेशल टास्क फोर्स' स्थापन करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.