'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 19:39 IST2023-12-11T19:38:20+5:302023-12-11T19:39:14+5:30

टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने 'हाय नाना' पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

Allu Arjun's Shout Out To Mrunal Thakur On Her Hi Nanna Performance | 'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला...

'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला...

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र 'हाय नाना' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाला अफलातून प्रतिसाद मिळत आहे.  चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली आहे.  मृणालची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.  नुकतंच टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने 'हाय नाना' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

अर्जुनने लिहिले, 'हाय नाना'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. किती सुंदर चित्रपट आहे. खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा हा सिनेमा आहे. नानी तु चित्रपटात अतिशय सुंदर अभिनय केला आहे. आणि प्रिय मृणाल ठाकूर तुझ्यातील गोडवा पडद्यावर दिसून येतो आहे. आणि ती तुझ्यासारखीच सुंदर आहे'. 

पुढे तो म्हणाला,  'बेबी कियारा! तुझा गोंडसपणा अगदी ह्रदये पिघळवणारा आहे. आता शाळेत जा. इतर सर्व कलाकारांचे कामगिरीबद्दल आणि तंत्रज्ञांचे त्यांच्या कामासाठी अभिनंदन. दिग्दर्शक शौर्यचेही अभिनंदन. तू तुझ्या पहिल्याच चित्रपटाने सर्वांना प्रभावित केलेस. चित्रपटातून तुम्ही अनेक हृदयस्पर्शी क्षण निर्माण केले आहेत. अप्रतिम सादरीकरण. 'हाय नाना' केवळ वडिलांच्याच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे'.

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा सुपरस्टार नानी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हाय नाना' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  यावेळी तो एका अतिशय भावूक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'हाय नाना' या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूरची जोडी पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अल्लु अर्जुन 

7 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'हाय नाना' हा चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्याभोवती फिरते. या चित्रपटात अभिनेता नानीने वडिलांची भूमिका साकारली होती. अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता लवकरच 'पुष्पा: द रुल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Allu Arjun's Shout Out To Mrunal Thakur On Her Hi Nanna Performance