Pushpa 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २' चं वादळ, पहिल्या तीनच दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 09:11 IST2024-12-08T09:10:35+5:302024-12-08T09:11:44+5:30
Pushpa 2 Collection: अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २'ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Pushpa 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २' चं वादळ, पहिल्या तीनच दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2: The Rule)चा बॉक्सऑफिसवर धमाका सुरु आहे. सिनेमा रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत आणि या तीनच दिवसात सिनेमाने आपलं बजेट वसून केलं आहे. प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. तेलुगू असो किंवा हिंदी दोन्ही भाषांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी तितकीच गर्दी होत आहे. 'पुष्पा २' चं तीन दिवसांचं बॉक्सऑफिस कलेक्शन किती वाचा.
अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २'ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २०२१ साली 'पुष्पा:द राइज' आला होता. तर आता त्याचा सीक्वेल आला आहे. थिएटरमधली प्रेक्षकांची गर्दी बघता सिनेमाने तीनच दिवसात मोठा गल्ला जमवला आहे.
५ डिसेंबर (गुरुवार) रोजी पहिल्याच दिवशी 'पुष्पा'ने १६४ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमाईत काहीशी घट झाली. सिनेमाने ९३.८ कोटी कमावले. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल शनिवारी सिनेमाने पुन्हा झेप घेत ११५ कोटींचा बिझनेस केला. यासोबतच सिनेमाची देशातील आतापर्यंत एकूण ३८३.७ कोटी रुपये आहे. तर जगभरात 'पुष्पा'ने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. यासोबत सिनेमाने आपलं बजेट पहिल्या तीनच दिवसात वसूल केलं आहे.
'पुष्पा २' फेम रश्मिका मंदानाच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडीओ होतोय व्हायरल, सिंपल लूकवर फिदा झाले चाहते
'पुष्पा ३' ही येणार
पुष्पा २ चा शेवट तिसऱ्या सीक्वलच्या इंट्रोडक्शनने होतो. यातून कन्फर्म होते की, तिसरा भाग येणार आहे. तिसऱ्या सीक्वलचं शीर्षक असणार आहे पुष्पा द रॅम्पेज. हा तिसरा भाग येण्यासाठी दुसऱ्या सीक्वलपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. पुष्पा ३च्या प्रोडक्शनला सुरू होण्यासाठी कमीत कमी ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुष्पा द रॅम्पेजची शूटिंग २०२८ किंवा २०२९मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सीक्वलमध्ये विजय देवरकोंडा अल्लू अर्जुनसोबत झळकण्याची शक्यता आहे.