'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:05 IST2025-04-08T12:59:46+5:302025-04-08T13:05:13+5:30

एकाच अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, रामचरणसोबत तिच्या अफेअरमुळे चिडलेला अल्लू अर्जुन

Allu Arjun Ram Charan Teja were in love with actress neha sharma which created the rift between the two brothers | 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रामचरण (Ramacharan Teja) नात्याने एकमेकांचे चुलत भाऊही आहेत. ऑनस्क्रीन त्यांच्यात युद्ध असलं तरी ऑफस्क्रीनही त्यांच्यात भावाचं प्रेम पाहायला मिळत नाही. याला कारण आहे चक्क एक अभिनेत्री. आधी अल्लू अर्जुन त्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता. मात्र नंतर रामचरण तेजा मध्ये आल्याने अभिनेत्रीने अल्लूला सोडलं अशी चर्चा आहे. याच कारणामुळे नंतर दोन्ही भावांमध्ये दुरावा आला. कोण आहे ती अभिनेत्री?

अल्लू अर्जु हा प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे. अल्लूची आत्या सुरेखा कोनिडेला मेगास्टार चिरंजीवीची पत्नी आहे. त्यामुळे रामचरण अल्लूचा आतेभाऊ आहे. लहानपणी दोघांमध्ये खूप छान बाँड होता. मात्र २००७ साली त्यांच्यात दुरावा आला जो आजतागायत कायम आहे. अल्लू अर्जुनने २०११ साली स्नेहा रेड्डीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अल्लूनंतर एका वर्षातच रामचरणनेही लग्न केलं. रामचरण आणि उपासना शाळेपासूनच सोबत होते.

कोण आहे ती अभिनेत्री?

आपापल्या संसारात सुखात असलेल्या या दोन्ही भावांमध्ये लग्नाआधीच एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली होती. ती म्हणजे नेहा शर्मा (Neha Sharma). नेहाने बॉलिवूडमध्ये येण्याआधी तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं होतं. अल्लू अर्जुन आणि रामचरण सोबतही तिने स्क्रीन शेअर केली होती. अल्लूसोबत काम करताना दोघांमध्ये अफेअर सुरु झालं. अल्लूला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र तेव्हाच रामचरणची एन्ट्री झाली. २००७ साली नेहाने 'चिरुथा' मधून पदार्पण केलं होतं. हा रामचरणचाही पहिला सिनेमा होता. अल्लूला त्यांची जवळीक रुचली नाही. तसंच रामचरण आपला भाऊ आहे यामुळे त्याला अजूनच धक्का बसला होता. सिनेमाच्या रिलीजपर्यंत नेहा आणि रामचरणच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. यामुळे अल्लू आणि रामचरण यांच्यात दुरावा आला. त्यांच्यात बोलणंही बंद झालं. रामचरणने मात्र नंतर कधीच नेहा शर्मासोबतच्या अफेअरवर स्पष्टीकरण दिलं नाही.

अल्लूची भेटही घेतली नाही

अल्लू आणि रामचरण सार्वजनिक ठिकाणी जरी एकमेकांसोबत चांगले दिसत असले तरी आजही त्यांच्या मनातली दरी कायम आहे. 'पुष्पा २' च्या वेळी जेव्हा अल्लू अर्जुनला अटक झाली होती तेव्हा इंडस्ट्रीतले अनेक जण त्याला भेटायला गेले होते. या सगळ्यात रामचरण मात्र कुठेच नव्हता. नंतर एका कार्यक्रमात दोघं सोबत दिसून आले होते. 

Web Title: Allu Arjun Ram Charan Teja were in love with actress neha sharma which created the rift between the two brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.