"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:44 IST2025-06-06T18:39:30+5:302025-06-06T18:44:01+5:30
सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हायवेवर भीषण अपघात झाला असून अभिनेत्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. अभिनेत्याच्या ड्रायव्हरने घडलेली भयानक घटना सांगितली

"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात?
मनोरंजन विश्वातून आज सकाळी एक वाईट बातमी आली. ती म्हणजे मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोच्या (shine tom chacko accident) गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अभिनेत्याच्या वडिलांचं जागीच निधन झालं. हा अपघात इतका जबरदस्त होता की, अभिनेत्याच्या गाडीचा चक्काचूर झाला. याशिवाय शाइन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या भीषण अपघातानंतर अभिनेत्याच्या ड्रायव्हरचं अधिकृत वक्तव्य समोर आलं आहे.
गाडी १०० च्या स्पीडने होती अन्...
अभिनेता शाइन टॉम चाकोच्या ड्रायव्हरने मनोरमा न्यूजशी बोलताना याविषयी खुलासा केला. ड्रायव्हरच्या सांगण्यानुसार, "आज प्रवास करताना आमची गाडी ताशी ८० ते १०० च्या स्पीडने भरधाव वेगात होती. कारच्या समोरुन जात असणाऱ्या ट्रकने अचानक त्याची लाइन बदलली त्यामुळे आमची गाडी त्या ट्रकला धडकली. शाइन टॉम चाकोचे वडील कारच्या पुढच्या सीटवर बसले होते. या भीषण अपघातामुळे टॉमच्या वडिलांच्या डोक्याला मार बसला. त्यामुळे अभिनेत्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला."
Get well soon #ShineTomChacko & his family.. pic.twitter.com/vEFdMziyq7
— Fukkard (@Fukkard) June 6, 2025
टॉम त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत बंगळुरुला जात होता. त्यावेळी सलेम-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात टॉमच्या उजव्या हाताला जबर दुखापत झाली असून त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे. टॉमच्या आईच्या कमरेला मार बसला असून त्याच्या भावाच्या हाताला दुखापत झाली आहे. आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. या भीषण अपघातानंतर अभिनेत्याच्या परिवाराला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.