अभिनेत्री साई पल्लवीच्या घरी लगीनघाई; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:04 IST2024-01-25T13:01:41+5:302024-01-25T13:04:58+5:30
साई पल्लवीच्या घरात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरू झाली आहे.

अभिनेत्री साई पल्लवीच्या घरी लगीनघाई; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी नो- मेकअप लुक व अभिनयामुळे चर्चेत असते. चाहतेदेखील तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तर साई पल्लवीच्या घरात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरू झाली आहे. नुकतंच साईनं साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
नुकतंच तिच्या घरी थाटामाटात साखरपूडा पार पडला आहे. पण, तो साई पल्लवीचा नाही तर तिच्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे. साई पल्लवीची लहाण बहिण पूजाचा विनीत कननशी २१ जानेवारी रोजी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा झाला. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. फोटोंमध्ये तिचे पुर्ण कुटुंब आनंदी दिसून येत असून दोघी बहिणींमधला बॉन्डिंगही चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
साईने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या लहानशा बहिणीचा साखरपुडा झाला, यावर विश्वासच बसत नाहीये. विनीत कनन तुला माहित नाही की तू काय मिळवलं आहेस. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे'. साईच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच 'तु कधी लग्न करणार' असा प्रश्नही तिला चाहत्यांनी केला.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी साई पल्लवीने लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. साई पल्लवीचा राजकुमार पेरियासामीसोबतचा गळ्यात हार असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन तिनं गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. व्हायरल झालेल्या फोटोंवर पोस्ट करत साई पल्लवीने संताप व्यक्त केला आहे. अफवा पसरवणाऱ्यांना तिनं चांगलंच खडसावलं होतं. तसेच तो फोटो शुटिंगमधला असल्याचं सांगितलं होतं.