सलमान-शाहरुखचा सायकलिंग करतानाचा फोटो व्हायरल

By Admin | Updated: July 1, 2016 21:30 IST2016-07-01T21:30:51+5:302016-07-01T21:30:51+5:30

किंग खान शाहरुख आणि दबंग स्टार सलमान सायकलिंग करत असतानाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शाहरुखने सलमानसोबतचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे

Salman-Shahrukh cycling photo viral | सलमान-शाहरुखचा सायकलिंग करतानाचा फोटो व्हायरल

सलमान-शाहरुखचा सायकलिंग करतानाचा फोटो व्हायरल

>ऑनलाइन लोमकत
मुंबई. दि. १ : कतरीना कैफच्या पार्टीत झालेल्या वादंगानंतर इफ्तार पार्टीत एकत्र आलेले बॉलिवूडमधील सलमान आणि शाहरुख कान यांच्यातील मैत्री आता वाढतच आहे. असे म्हणतात की, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या न्यायाने बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सलमान आणि शाहरुख यांच्यातही पूर्वी विस्तव जात नव्हता. मात्र एका इफ्तार पार्टीने दोघांना एकत्र आणलं आणि कट्टर प्रतिस्पर्धी अचानक एकमेकांचे गोडवे गायला लागले.
 
किंग खान शाहरुख आणि दबंग स्टार सलमान सायकलिंग करत असतानाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शाहरुखने सलमानसोबतचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. भाई भाई ऑन बाईक बाईक. प्रदुषण शून्य. भाई म्हणतो मायकल लाल सायकल लाल असं अनोखं कॅप्शन शाहरुखने त्या फोटोला दिले आहे.
गुरुवारी रात्री शाहरुख-सलमानने थोडा मोकळा वेळ काढला आणि मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंगचा मनसोक्त आनंद लुटला. हा फोटो एसआरकेने सकाळी शेअर केला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Salman-Shahrukh cycling photo viral