लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:06 IST2025-06-10T11:05:49+5:302025-06-10T11:06:25+5:30

रेणुका शहाणेने २००१ साली वयाच्या ३५ व्या वर्षी आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न केलं होतं. २००२ साली तिला मुलगा झाला.

renuka shahane reveals she was adviced to lose weight after giving birth to baby boy | लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला

लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला

मराठीसोबत हिंदीतही सक्रिय असलेली अभिनेत्री रेणुका शहाणे(Renuka Shahane). आपल्या गोड हास्यामुळे आणि अभिनयामुळे तिने सर्वांचंच मन जिंकलं. 'हम आपके है कौन' सिनेमामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. आजही तिला या सिनेमामुळे ओळखलं जातं. रेणुका शहाणेने २००१ साली वयाच्या ३५ व्या वर्षी आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न केलं होतं. २००२ साली तिला मुलगा झाला. लेकाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी वजन कमी करण्यास सांगितल्यावर तिला धक्काच बसला होता. नुकताच तिने हा किस्सा सांगितला.

गौहर खानच्या 'माँनोरंजन' पॉडकास्टमध्ये रेणुका शहाणे म्हणाली, "२००२ साली मला पहिला मुलगा झाला. आता सगळं ठीक होईल अशी मला आशा होती. पण हे सोपं नव्हतं. आशुतोष यांचे डॉक्टर मित्र त्यांच्या पत्नीसोबत मला भेटायला आले होते. त्यांचे पहिले शब्द हे होते की, 'आता तुला वजन कमी करावं लागेल.' ते ऐकून मला धक्काच बसला होता. आई झाल्यानंतर मी अनेक भावनांमधून जात होते. मी आनंदी होते पण जरा गोंधळलेलीही होते. आजूबाजूच्या लोकांचं बोलणं ऐकून मी खूप हैराण होते. समाजाची एका आईकडून काय अपेक्षा असते याची मला हळूहळू जाणीव झाली."

आशुतोष राणांनी रेणुका शहाणेशी त्यांच्या गुरुंच्या सांगण्यावरुन लग्न केलं होतं. पण तेव्हा आम्ही दोघं डेटही करत होते. गुरुंनीही रेणुकाचंच नाव घेतल्याने आशुतोष राणांना खात्री पटली असंही तिने मुलाखतीत सांगितलं. तर दुसरीकडे राणाजींनी रेणुकाला मागणी घातल्यानंतर तिच्या आईने मात्र शंका व्यक्त केली होती. 'केवळ गुरुजींनी सांगितलं म्हणून लग्न करणारे की खरोखर करायचंय?' असा प्रश्न रेणुकाच्या आईने केला होता. मात्र रेणुका लग्नाला तयारच होती. कारण तिला मूल हवं होतं. मुलांसाठी मला स्थिर फॅमिली बॅकग्राऊंड हवं होतं. जे तिला राणाजींच्या रुपात मिळणार होतं. कारण ते कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत."

Web Title: renuka shahane reveals she was adviced to lose weight after giving birth to baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.