‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्येही प्रियांकाची झलक

By Admin | Updated: March 28, 2017 04:46 IST2017-03-28T04:46:17+5:302017-03-28T04:46:17+5:30

‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेली प्रियांका चोपडा चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये काही सेंकदच बघावयास

Priyanka's look in the second trail of 'Bevock' | ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्येही प्रियांकाची झलक

‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्येही प्रियांकाची झलक

‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेली प्रियांका चोपडा चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये काही सेंकदच बघावयास मिळाल्याने तिच्या चाहत्यांची घोरनिराशा झाली होती. आता चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यात किमान एक डायलॉग बोलताना प्रियंका दिसत आहे. या ट्रेलरमध्ये तिला फारसे समाधानकारक स्थान मिळाले नसले तरी, तिच्या तोंडून ऐकावयास मिळत असलेला डायलॉग तिच्या फॅन्सला नक्कीच सुखावणारा असेल. ट्रेलरमध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन या दोघांनाच अधिक स्थान देण्यात आले आहे. फक्त एकाच ठिकाणी प्रियांका ड्वेन जॉनसनसोबत डायलॉग बोलताना बघावयास मिळत आहे. चित्रपटात प्रियंका व्हिक्टोरिया लिड्स नावाची निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये ती ड्वेन जॉनसनला म्हणतेय की, ‘काही लोक कुठल्याच गोष्टींसाठी चांगले नसतात’. प्रियांकाचा आवाज आणि अ‍ॅटिट्यूट जबरदस्त असून, तिने निगेटिव्ह भूमिकेला पुरेपूर न्याय दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या दोन्ही ट्रेलरवरून ‘बेवॉच’ हा चित्रपट मनोरंजक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही स्टंट सीक्वेंसही दाखविण्यात आले आहेत. शिवाय ड्वेन जॉनसनचे अ‍ॅब्स दाखविणारे काही सीन्सही यामध्ये आहेत.

Web Title: Priyanka's look in the second trail of 'Bevock'