'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 18:05 IST2024-03-30T17:57:27+5:302024-03-30T18:05:44+5:30
Datta more: आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे दत्तू मोरे (datta more) .
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर तो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.
पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतही तो झळकला आहे.
आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.
दत्तू आणि स्वाती यांचं प्री वेडिंग प्रचंड चर्चेत आलं होतं. तेव्हापासून त्याची बायको काय करते? कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.
दत्तूच्या बायकोचं नाव स्वाती घुनागे असं असून ती एक डॉक्टर आहे.
स्वाती स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि पुण्यात तिचं स्वत:चं क्लिनिकदेखील आहे. इतकंच नाही तर ठाण्यातही तिचं क्लिनिक आहे.