...तर 'समांतर'मध्ये स्वप्निलबरोबर रोमान्स करताना दिसली असती प्राजक्ता, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "सईमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:08 PM2024-01-05T13:08:46+5:302024-01-05T13:20:16+5:30

"'समांतर २'मध्ये सईच्या बोल्ड भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं होतं, पण...", प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे.

पण, लोकप्रिय असूनही प्राजक्तालाही अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं.

प्राजक्ताने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

या मुलाखतीत रिजेक्शनबद्दल बोलताना प्राजक्ताने 'समातंर २'साठी सिलेक्शन झाल्याचा खुलासा करत रिजेक्शनची खंतही व्यक्त केली.

"मला वाईट वाटलं होतं. 'समांतर २'मधील सईच्या भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. ती बोल्ड भूमिका होती."

"त्यांना सात्विक गोड चेहरा असलेली अभिनेत्री हवी होती. ते कॅरेक्टरच असं होतं की ती साधी दिसणारी व्यक्ती नंतर बोल्ड निघते. माझ्या चेहऱ्याचा त्यांना तिथे तसा वापर केला होता."

"माझं सिलेक्शनही झालं होतं. १५ दिवसांमध्ये काम सुरू होणार होतं. दोन दिवसांत कॉन्ट्रॅक्टवर सही होणार होती. कामाचे पैसेही ठरले होते. पण, मला फोनच येईना."

"माझे फोनही उचलले जात नव्हते. त्यानंतर एका आठवड्याने मला कळलं की ती भूमिका सई करत आहे."

"मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की तुला पूर्णवेळ तिकडे राहायला लागलं असतं. करोना होता, त्यामुळे हास्यजत्रेमुळे तुला जमलं नसतं. म्हणून तुला नाही घेतलं गेलं."

"आणखी एक चित्रपट होता. त्यात ललितबरोबर मी काम करणार होते. नंतर मला कळलं की मी चित्रपटात काम करत नाहीये. एका महिन्यात या दोन्ही गोष्टी घडल्या."

"'समांतर'वेळी मला माहीत होतं की ते सईबरोबर जास्त कंम्फर्टेबल आहेत. त्यांची ती आधीची टीमच होती. आणि करोनाचाही फॅक्टर होता. पण, ठिके तरीही मी ते मान्य केलं."