'बालिका वधू'मधील छोट्या आनंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांच्या वयात आहे इतकं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:06 IST2025-06-12T13:00:12+5:302025-06-12T13:06:29+5:30
गेल्या ५ वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. अविकाचा होणारा नवरा नक्की काय करतो वाचा.

२००६ साली आलेली 'बालिका वधू' मालिका खूप गाजली. यातील छोट्या आनंदीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor)लोकप्रिय झाली. तेव्हा ती फक्त १० वर्षांची होती.
आता हीच छोटी आनंदी म्हणजेच अविका मोठी झाली आहे. तिने नुकतीच साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
अविका गेल्या ५ वर्षांपासून बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा तिने त्याच्याबरोबरचे फोटो शेअर केले होते. दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही चर्चेत होते. अखेर त्यांनी नात्याला पुढे घेऊन जायचं ठरवलं आहे.
अविकाचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) नक्की काय करतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. दोघांच्या वयात नक्की किती अंतर आहे हेही जाणून घेऊया
मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली.
मिलिंदने एमटीव्ही रोडीज शोमध्येही सहभाग घेतला होता. त्याचा सोशल सर्विसकडे जास्त कल आहे. तसंच तो 'कुकू एफएम'मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरही होता.
मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.
अविका गौरचा जन्म ३० जून १९९७ सालचा आहे. काहीच दिवसात ती २८ वर्षांची होणार आहे. तर मिलिंद चंदवानी ३४ वर्षांचा आहे. दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे.