वयाच्या १७ व्या वर्षीच बनली स्टार, राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला; 'त्या' स्कँडलमुळे करिअर उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:20 IST2025-07-20T14:06:53+5:302025-07-20T14:20:42+5:30

अभिनेत्रीची एक सीरिज सध्या खूप गाजत आहे.

२००२ साली आलेला 'मकडी' सिनेमा आठवतोय? लहान मुलांना या सिनेमाने हादरवून सोडलं होतं. शबाना आझमी यांनी सिनेमात चेटकिणीची भूमिका साकारली होती.

'मकडी' सिनेमामुळे श्वेताने लहान वयातच प्रसिद्धी मिळवली. 'कहाणी घर घर की','करिश्मा का करिश्मा' या मालिकांमध्येही ती दिसली. २००५ साली आलेल्या श्रेयस तळपदेच्या 'इकबाल'मध्येही ती होती.

या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसादने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिने यामध्ये डबल रोल केला होता. यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

वयाच्या १७ वर्षी ती साऊथ इंडस्ट्रीत स्टार बनली. २००८ साली आलेल्या 'कोठा बंगारु लोकम' या सिनेमाने तिला खूप यश मिळवून दिलं. नंतर ती 'कैस्को','राइड','कलवार किंग' या सिनेमांमध्ये दिसली. यातला 'राइड' सुपरहिट झाला.

करिअरच्या शिखरावर असताना श्वेता बासू प्रसाद एका स्कँडसमध्ये अडकली आणि तिच्या करिअरला ग्रहणच लागलं. या स्कँडलमुळे तिची ओळखच ही बनली. नक्की काय घडलं होतं?

२०१४ साली हैदराबादच्या 'बंजारा हिल्स' हॉटेलमध्ये श्वेता बासू प्रसादचं सेक्स स्कँडलमध्ये नाव आलं. तिने नंतर तसं मान्यही केल्याचं कळलं होतं. पैशांच्या अडचणींमुळे ती त्या व्यवसायाकडे वळाली.

यानंतर तिला रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आलं. मात्र जेव्हा तिला या प्रकरणात क्लीन चीट मिळाली तेव्हा तिथून सुटल्यानंतर तिने आपण हे आरोप मान्य केलेच नव्हते असं सांगितलं.

नंतर श्वेताने 'बद्रीनाथ की दुल्हनियां'मध्ये वरुण धवनच्या वहिनीची भूमिका केली आणि इंडस्ट्रीत कमबॅक केलं. ती 'त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर' सीरिजमध्येही झळकली.

ओटीटीवर सर्वात गाजणारी सीरिज 'क्रिमिनल जस्टीस' मध्ये श्वेता झळकली आणि तिच्या करिअरला पुन्हा नवी दिशा मिळाली. या सीरिजमुळे तिला जोरदार कमबॅक मिळालं.