टीव्हीवरील संस्कारी सूनेचा बिकिनीत हॉट अंदाज, नवऱ्याबरोबर करतेय हनिमून एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:26 PM2024-04-17T12:26:48+5:302024-04-17T12:33:58+5:30

मराठी अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, फोटो पाहून चाहते अवाक्

'जीव माझा गुंतला' या मालिकेतील ऑनस्क्रीन जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली आहे.

मोठ्या थाटामाटात योगिता आणि सौरभ यांचा लग्नसोहळा पार पडला. ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही खूश आहेत.

लग्नानंतर योगिता आणि सौरभ हनिमूनसाठी परदेशात गेले आहेत. थायलंडमध्ये योगिता आणि सौरभ त्यांचा हमिनून साजरा करत आहेत.

योगिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन थायलंड ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. योगिता बिकीनीमध्ये बीचवर एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.

निळ्या बिकिनीतील तिचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

योगिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.