मोहितची रिअल लाइफ स्वीटू आहे तितकीच गोड आणि सुंदर; पाहा कोण आहे त्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:00 PM2022-01-03T13:00:00+5:302022-01-03T13:00:00+5:30

Nikhil raut: सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या मालिकेत मालविकासोबत खलनायकाची भूमिका साकारणारा मोहितदेखील लोकप्रिय ठरला. मोहितची भूमिका अभिनेता निखील राऊत (Nikhil Raut) याने साकारली आहे.

खानविलकरांची संपत्ती मिळावी यासाठी स्वीटूसोबत लग्न करणाऱ्या मोहितची रिअल लाइफ स्वीटूदेखील तितकीच सुंदर आणि साधी आहे.

सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

निखीलच्या पत्नीचं नाव मयुरी राऊत असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मयुरी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.

२२ एप्रिल २०१४ रोजी निखिलने मयुरीशी लग्नगाठ बांधली. मयुरी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे.

निखील अनेकदा सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

निखीलने त्याच्या पत्नीसाठी खास बर्थ डे सेलिब्रेशन केलं होतं.