ना शिवाली, ना नम्रता...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांपैकी गौरव मोरेच्या घरी कोणीच का आलं नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:03 IST2026-04-09T15:58:45+5:302026-04-09T16:03:34+5:30
अनेक सेलिब्रिटींनी गौरव मोरेचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार गौरव मोरेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने काही दिवसांपूर्वीच लग्न करत नव्या घरात गृहप्रवेश केल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.

गौरव मोरेने अनेक सेलिब्रिटींना आणि काही नेतेमंडळींनाही गृहप्रवेशासाठी आमंत्रित केलं होतं.

अनेक सेलिब्रिटींनी गौरव मोरेचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार गौरव मोरेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

एवढंच नव्हे तर कोणत्या कलाकराने त्याचं सोशल मीडियावर अभिनंदनही केलं नाही. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार गौरव मोरेच्या घरी का गेले नाहीत? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शिवाली परब, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, समीर चौघुले ही मंडळी ऑस्ट्रेलियाला होती.

तर थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या प्रयोगासाठी नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत, प्रथमेश शिवलकर अमेरिका दौऱ्यावर होते.

पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता रोहित मानेने पत्नीसह गौरव मोरेच्या घरी हजेरी लावली होती. त्याने त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या.

















