Rocky Jaiswal : कोण आहे रॉकी जयस्वाल, हिना खानसोबत कुठे झाली पहिली भेट? १३ वर्षे एकमेकांना केलं डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:40 IST2025-06-05T16:28:23+5:302025-06-05T16:40:54+5:30
Hina Khan And Rocky Jaiswal : कॅन्सरशी झुंजणाऱ्या हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने लग्न केलं आहे. कॅन्सरशी झुंजणाऱ्या हिनाने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे.
लग्नाचे फोटो पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. यासोबतच तिचा पती रॉकी जयस्वालबद्दल माहिती जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. रॉकी काय काम करतो, त्याची आणि हिनाची पहिली भेट कुठे झाली हे जाणून घेऊया...
रॉकी मल्टीटॅलेंटेड आहे. त्याने टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे. आयएमडीबीनुसार, त्याने शोसाठी सुपरवायझर प्रोड्यूसर म्हणून काम केलं आहे.
रॉकीने 'ससुराल सिमर का', 'अग्निपरीक्षा' आणि 'जीव की: गंगा' मध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम केलं आहे.
हिरोज फॉर बेटर फिल्म्स नावाचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. 'विशलिस्ट', 'डोरमन' आणि 'लाइन्स' सारखे चित्रपट त्याच्या प्रोडक्शनमध्ये तयार केले आहेत.
रॉकीचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील चालवतो. याशिवाय त्याने स्वतःचं नवीन RockAByte एप देखील तयार केलं आहे. याच्या मदतीने तो नवीन टॅलेंटला संधी देतो.
रॉकी जयस्वाल एका मध्यमवर्गीय मारवाडी कुटुंबातील आहे. तो वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी प्रॉडक्शन लाईनमधले बारकावे शिकला.
२००५ मध्ये तो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. रॉकी आणि हिना 'ये रिश्ता क्या कहलाता है...' दरम्यान पहिल्यांदा भेटले. दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
हिनाच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण काळ आला तेव्हा रॉकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता दोघांनीही लग्न करून नवीन सुरुवात केली आहे.
हिना खान सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असून पर्सनल लाईफबद्दलचे अनेक अपडेट देत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.