'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात आज बांधणार लग्नगाठ!; त्याआधी व्हायरल झाले हळदी सेरेमनीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:49 IST2023-02-02T13:46:00+5:302023-02-02T13:49:26+5:30
Vanita Kharat : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आज बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आज बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
लग्नाआधीच तिच्या मेहंदी आणि हळदी सेरेमनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
वनिता खरातच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत आहे.
हळदीला वनिता खरात आणि सुमित लोंढे यांनी मॅचिंग आउटफिट परिधान केले होते.
हळदी सेरेमनीत ते दोघे रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. वनिता व सुमितने त्यांच्या लग्नासाठी खास #su’MEET’vani हा हॅशटॅग तयार केला आहे.
काही दिवसांपूर्वी वनिताने प्री वेडिंग फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. त्यांच्या या फोटोंची सर्वत्र खूप चर्चा झाली होती.
वनिता खरातचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे.