म्हणून बिचुकले ‘Bigg Boss 15 ’च्या फिनालेकडे फिरकलाच नाही? या स्पर्धकांनीही फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:50 PM2022-01-31T14:50:29+5:302022-01-31T14:58:15+5:30

Bigg Boss 15 Grand Finale : काल रविवारी ‘बिग बॉस 15’चा ग्रँड फिनाले रंगला. पण ‘बिग बॉस 15’चा ग्रँड फिनालेत यापैकी अनेक चेहरे गायब दिसले. पण का?

बिग बॉसच्या घरात 99 दिवस राहणारा उमर रियाज काही आठवड्यांपूर्वीच ‘बिग बॉस 15’मधून आऊट झाला होता. एका टास्कदरम्यान प्रतिक सहजपालसोबत त्याचा वाद झाला होता. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. यामुळे बिग बॉसने शिक्षा देत, उमरला घरातून काढलं होतं. चर्चा खरी मानाल तर, यामुळे उमर रियाज कालच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला नाही. उमरच्या मते, त्याचं एलिमिनेशन अनफेअर होतं.

अभिजीत बिचुकले हाही ‘बिग बॉस 15’ ग्रँड फिनालेमध्ये हजर नव्हता. बिग बॉसच्या घरात अभिजीत अनेकदा मर्यादा लांघताना दिसला. यावरून सलमानने त्याला शोमधून बाहेर करण्याची धमकी दिली होती. अभिजीत बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर त्याने सलमानवर अनेक गंभीर आरोप लावले होते. असे 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करीन, असं तो म्हणाला होता. कदाचित सलमानमुळे अभिजीत बिचुकलेने शोमध्ये येणं टाळलं.

जय भानुशाली हा ‘बिग बॉस 15’मध्ये जाणारा पहिला कंटेस्टंट होता. पण तो फिनालेमधून गायब होता. जय भानुशाली त्याच्या अनफेअर इविक्शनमुळे नाराज होता. यामुळे तो फिनालेमध्ये गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. पण खरं कारण त्यालाच ठाऊक.

सिम्बा नागपाल हाही कालच्या ‘बिग बॉस 15’च्या ग्रँड फिनालेमध्ये गैरहजर होता. सिम्बा या सीझनचा सर्वात कूल आणि शांत स्पर्धक होता. 53 दिवसांनंतर तो घरातून बाद झाला. त्याला बेघर करण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी वोटिंग करत, एकमताने निर्णय घेतला होता. सिम्बा ‘बिग बॉस 15’च्या ग्रँड फिनाले येऊ इच्छित होता. पण फिल्मबीटच्या एका रिपोर्टनुसार, प्रकृती बरी नसल्यामुळे तो फिनाले अटेंड करू शकला नाही.

देवोलिना भट्टाचार्जी वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून ‘बिग बॉस 15’मध्ये गेली होती. मात्र एका टास्कदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली. यामुळे डॉक्टरांनी तिला सर्जरीचा सल्ला दिला होता. देवोलिनाची सर्जरी झाली असून ती रूग्णालयात आहे. त्यामुळे ती कालच्या ग्रँड फिनालेत हजर नव्हती.

अफसाना खान ही ‘बिग बॉस 15’ची स्पर्धक होती. शमिता शेट्टीसोबतच्या हिंसक वागणुकीमुळे बिग बॉसने तिची शोमधून हकालपट्टी केली होती. चर्चा खरी मानाल तर शमितामुळेच अफसाना‘बिग बॉस 15’च्या ग्रँड फिनालेला आली नाही. अर्थात यात किती सत्य आहे, हे आम्हाला माहित नाही. तशी अफसाना सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे. कदाचित यामुळेही ती ग्रँड फिनालेमध्ये येऊ शकली नसावी.

डोनल बिष्ट, नेहा भसीन आणि साहिल श्रॉफ हेही फिनालेमध्ये हजर नव्हते. साहिल पहिल्याच आठवड्यात शोमधून बाहेर झाला होता. पाठोपाठ डोनलला घरच्यांनी वोट करून शोमधून बाद केलं होतं.

विधी पांड्या ही सुद्धा फिनालेला हजर नव्हती. शोच्या पहिल्या आठवड्यातच विधीचा पत्ता कट झाला होता. या इविक्शनमुळे विधी नाराज होती. कदाचित याचमुळे विधीने शोच्या फिनालेकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता आहे.