अंगप्रदर्शन करण्यास अजिबात मागंपुढं पाहत नाहीत या टीव्ही अ‍ॅक्ट्रेस, यावर्षी बिकिनी लूकमध्ये लावलीय आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:33 PM2022-12-26T12:33:43+5:302022-12-26T12:36:36+5:30

TV Actress : टीव्ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अदांनी नेटिझन्सचं लक्ष वेधून घेण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी सुनेच्या रूपात दिसणाऱ्या अभिनेत्री जेव्हा बोल्ड रूप दाखवतात तेव्हा फॅन्स घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावर्षी टीव्ही मालिकांमधील अनेक सुनांनी बिकिनी अवतार दाखवत फॅन्सना घायाळ केले आहे. पाहुयात या अभिनेत्रींचे हॉट आणि बोल्ड फोटो.

टीव्ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अदांनी नेटिझन्सचं लक्ष वेधून घेण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी सुनेच्या रूपात दिसणाऱ्या अभिनेत्री जेव्हा बोल्ड रूप दाखवतात तेव्हा फॅन्स घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावर्षी टीव्ही मालिकांमधील अनेक सुनांनी बिकिनी अवतार दाखवत फॅन्सना घायाळ केले आहे. पाहुयात या अभिनेत्रींचे हॉट आणि बोल्ड फोटो.

टीव्ही स्क्रीनवर संस्कारी दिसणारी गोपी बहू अर्थात देवोलिना भट्टाचार्जी हिने जेव्हा बिकिनीमध्ये आपला बोल्ड अवतार दाखवला. तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली. देवोलिनाचे बिकिनी फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाले होते.

करिश्मा तन्ना लग्नानंतर अधिकच बोल्ड झाली आहे. या फोटोंमध्ये करिश्मा स्विमिंग पूलच्या शेजारी ब्लॅक मोनोकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी रॉय तिच्या कातिल अदांसाठी इंटरनेटच्या जगतात खूप प्रसिद्ध आहे. मौनी रॉय नेहमीच तिचं सेक्सी फिगर दाखवून फॅन्सचं लक्ष वेधून घेताना दिसत असते. या फोटोंमध्ये मौनी रॉय पिंक कलरच्या बिकिनीमध्ये हॉट पोझ देताना दिसत आहे.

निया शर्मा नेहमीच आपल्या बोल्डनेसमधून फॅन्सना घायाळ करताना दिसत आहे. मात्र ती बिकिनीमध्ये समुद्र किनाऱ्यावर ज्या प्रकारे पोझ देत आहे, त्यामुळे फॅन्स अवाक झाले आहेत. निया शर्माचे हे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत.

रुबिना दिलैक ने २०२२ मध्ये बिकिनी लूकद्वारे फॅन्सची झोप उडवली होती. रुबिनाला बिकिनी नेसून स्वीमिंग पूलमध्ये बसलेली पाहून फॅन्स अवाक झाले होते.