अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं अन् जुळ्या मुलांची आई झाली, लग्नाच्या २ वर्षांनंतर पतीपासून घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:36 IST2026-01-25T13:28:10+5:302026-01-25T13:36:36+5:30
सध्या 'द 50' शोची उत्सुकता आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता या शोमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सहभागी होणार आहे.

सध्या 'द 50' शोची उत्सुकता आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता या शोमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सहभागी होणार आहे.

या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं आहे. पुढे लग्नाच्या वर्षभरात १७ व्या वर्षी अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला. ही अभिनेत्री आता 'द 50' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे उर्वशी ढोलकिया. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि 'कोमोलिका' या अजरामर भूमिकेसाठी ओळखली जाते.

उर्वशी ढोलकियाचे लग्न अवघ्या १६ व्या वर्षी झाले होते. ज्या वयात मुले आपले करियर आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करतात, त्या वयात उर्वशीने संसाराची जबाबदारी स्वीकारली होती.

लग्नानंतर अवघ्या एक वर्षात, म्हणजेच वयाच्या १७ व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज अशी तिच्या मुलांची नावे आहेत.

उर्वशीचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नानंतर दीड-दोन वर्षातच तिचा घटस्फोट झाला. वयाच्या १८ व्या वर्षी ती दोन लहान मुलांची सिंगल मदर बनली होती.

उर्वशी ढोलकिया एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने 'कसौटी जिंदगी की', 'नागिन ६' आणि अनेक रिॲलिटी शोमध्ये आपली छाप सोडली आहे. आता जिओ+हॉटस्टारवरील 'द 50' शोमधून उर्वशी काय चमक दाखवणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

















