"सलूनमध्ये काम, कचराही काढला; वापरलेले टॉवेल धुतले..",लग्नानंतर शिल्पा शिरोडकरने केला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:30 IST2025-02-07T15:24:55+5:302025-02-07T15:30:12+5:30
शिल्पाने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. तेव्हा तिचा नवऱ्याचं शिक्षण सुरु होतं.

९० च्या दशकात आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar). त्या काळी शिल्पाची खूप चर्चा असायची.
शिल्पाने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं आणि ती गायब झाली. लग्नानंतर शिल्पाने कसे दिवस काढले याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, "२००० साली मी लग्न केलं तेव्हा माझा नवरा शिकत होता. आमचं अरेंज मॅरेज होतं. आम्ही एक वर्ष नेदरलँड्समध्ये राहत होतो. "
तेव्हा आमच्याकडे एक हजार गिल्डर्सचं बजेट असायचं. गिल्डर्स ही तिथली करन्सी होती. त्यातले ८०० रेंटला जायचे. बाकी २०० जेवण, प्रवास यातच जायचं. प्रत्येक शनिवारी फ्ली मार्केट असायचं. तिथे १० गिल़्डरमध्ये ५ किलो चिकन मिळायचं."
"आम्ही दर शनिवारी १० गिल्डर मध्ये ५ किलो चिकन घेऊन यायचो. रोज आम्ही चिकन करी विथ राईस खायचो. माझ्या नवऱ्याचे मित्रही आमच्या घरी खायला यायचे. कारण त्यांना भारतीय जेवण आवडायचं."
नंतर आम्ही न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालो. मला घरी राहायचं नव्हतं तर काम करायचं होतं. मी हेअर ड्रेसिंगचा कोर्स केला. डिप्लोमा केला. सलोनमध्ये काम केलं. वीकेंडला आम्हाला खूप काम असायचं कारण क्लाएंट्सची गर्दी असायची."
मी तिथे इंटर्न म्हणून काम केलं आहे. मग ते जमिनीवर पडलेले केस काढणं, वापरलेले टॉवेल धुणं, जमीन पुसणं हे सगळं केलं आहे. पण माझा नवरा बँकेत असल्याने त्याला नेमका वीकेंडलाच वेळ मिळायचा आमि मी तेव्हा व्यस्त असायचे. नवऱ्यासोबत वेळच मिळत नसल्याने मी ते काम सोडलं."
"नंतर मी नवऱ्याकडून माझा सीव्ही बनवून घेतला आणि मुलाखती दिल्या. मला एक नोकरीही मिळाली. एका कंपनीत क्रेडिट कंट्रोलर म्हणून दीड वर्ष काम केलं. "
"एकेकाळी ग्लॅमरच्या दुनियेत काम केल्यावर मी लग्नानंतर अशी सगळी कामही केली. मला वाटतं मी याचा फार विचार केला नाही. माझं तेच आयुष्य होतं आणि ते मला चांगलं करायचं होतं. मला स्वत:चा अभिमान वाटतो कारण मी आयुष्यात सतत प्रगती करत गेले. माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. "