'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री भक्तीमय वातावरणात दंग; साक्षी गांधी पोहोचली अमृतेश्वर मंदिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 19:12 IST2024-01-11T19:02:31+5:302024-01-11T19:12:10+5:30
Sakshee gandhi: साक्षीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.
ही मालिका संपून बरेच महिने झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार कायम नेटकऱ्यांच्या चर्चेत येत असतात.
सध्या या मालिकेतील अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी हिची चर्चा रंगली आहे.
साक्षी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच साक्षीने तिच्या बिझी शेड्युलमधून थोडासा ब्रेक घेत एका व्हेकेशनवर गेली आहे.
साक्षी सध्या तिचे व्हेकेशन एन्जॉय करत आहे. त्यामुळे तिने या व्हेकेशनचे काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहेत.
साक्षीने नुकतीच अमृतेश्वर मंदिराला भेट दिली. येथील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
साक्षीचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.